कुंडीत लावलेली तुळस
सुरवातीला जोमाने फोफावते
पण नंतर
हळूहळू तिची वाढ खुंटते
आणि ती मलूल होत जाते
अगदी नियमित पाणी घातले तरीही..!!
मानवी संवादाचे आणि सहवासाचे
अगदी तसेच असते
सुरवातीला रोचक वाटणारे
हे शब्दांचे रोपटे
हळूहळू खोचक आणि जाचक वाटत जाते
अगदी नियमित संपर्कात असलो तरीही..!!
***सुनिल पवार....✍🏼
No comments:
Post a Comment