Monday, 24 December 2018

|| कॅनव्हास ||

|| कॅनव्हास ||
========
कॅनव्हास
पांढरा असो
किंवा काळा असो, 
चित्रकाराची निष्ठा
त्यावर
सुंदर चित्र निर्माण करते..!!
आता
पिंपळपानाचंच
उदाहरण घेऊ..
हिरवे पान
कसे डोळ्यास सुखावते..
आणि
सुकलेले पान
सहज दुर्लक्षित होते..
पण
चित्रकाराची निष्ठा,
त्या सुकलेल्या पानातही
मनमोहक रंग भरते
आणि ते पान
डोळ्यांचे पारणे फेडते..
यासाठी
आवश्यक असते
ती केवळ
निष्ठा,संयम आणि एकाग्रता..
ती ज्याच्याजवळ असेल
तो आयुष्याचं चित्रही
तितकंच सुंदर रंगवू शकेल..
अगदी
सुरकुतीदार झालं तरीही..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment