

=============
ती सध्या काय करते..?
==============
अचानक ती म्हणाली
काय चावटपणा लावलाय हो
जो तो विचारतोय
ती सध्या काय करते..?
जळलं मेलं लक्षण
नुसत्या चांभार चौकशा
दिसत नाही का तुम्हास..?
फुटलेल्या तुमच्या घड्यात
तीच पाणी भरते..!!
अचंबित मी उत्तरलो
आता हे काय नवीन..?
मी कधी म्हणालो
ती सध्या काय करते..?
आणि
मला माहीत आहे
तू सर्वांसाठी किती करते
तुला करता उणे
शून्याशिवाय काय उरते..?
ती चिडली म्हणाली
माझं तुमचं सोडा हो
मी इतरांसाठी म्हणतेय
जरा फेसबुक,व्हाट्सअप चाळा
प्रत्येकाचं हेच दुखणं दिसतेय
म्हणे ती सध्या काय करते..?
ती मसणात का जाईना..
ह्यांच्या पोटात कशापायी दुखते..?
आता पेटली माझी ट्यूब
मी हसलो उत्तरलो
अगं तू समजते
त्यातला हा प्रकार नाही..
प्रमोशनाचा भाग आहे
बाकी काही नाही..
म्यान कर तलवार
आणि
संपव तुझी लढाई..!!
ती भानावर आली
म्हणाली
असं हाय व्हय.?
जळलं मेलं लक्षण
कळतंच नाही
कोणाचं मन
कधी काय बोलते..
बरं आता मला खरं सांगा
ती सध्या काय करते..??
मी..मूक


****सुनिल पवार...



No comments:
Post a Comment