Friday, 13 January 2017

|| ती अशीच येते ||

|| ती अशीच येते ||
============
ती अशीच येते नित्य
चंद्र तारका माळून..
रातराणी बहरते
आसमंती गंधाळून..!!

ती बहर पौर्णिमेचा
मी मुग्ध होतो भाळून..
अन ओढ अंतरीची
येते मनी उफाळून..!!
ती वाटेवरची छाया
का लुप्त होते वळून..
ही वेदना अवसेची
जाते हृदय जाळून..!!
रात्र अशीच सरते
जाते निद्रेस टाळून..
जागे अजून लोचन
स्वप्नास कवटाळून..!!
***सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment