Friday, 13 January 2017

|| तू आणि मी ||

पुतणीने तिच्या लग्नाच्या वाढदिवासा निमित्त आग्रहाने एक रचना लिहायला सांगितली..व तिचेच भाव कवितेत मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला..अन तिने सहमतीचा 👍🏼 दाखवला..😊
=====================
|| तू आणि मी ||
==========
मी पाहते
हळूच
उलघडून अलबम
आठवणींचा जुना..
अन
छबी तुझीच मोहक
नजरेत तरळते
साजना..!!

मी भेटते
नकळत
आपल्या भेटीच्या
त्या अमूल्य गोड क्षणांना..
अन
तू ही दिसतोस तिथेच
क्षितीजात नवे
रंग भरताना..!!
मी रमते
बागडते
भावी स्वप्नांच्या
सुमधुर भावविश्वात..
अन
तू असतोस सोबत
भरून श्वासात
तनामनात, रोमरोमात..!!
मी रेखिते
चित्र सुरेख
सुखी संसाराचे
तरल नात्याचे..
अन
तूच खुलवतोस तयास
घेऊन रूप
हळुवार कुंचल्याचे..!!
मी देते
धन्यवाद
त्या विधात्यास
दिली साथ क्षणोक्षणी..
अन
बांधली गाठ जन्मोजन्मीची
आजच्या ह्या गोड
अविस्मरणीय दिनी..!!
***सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment