II पाऊस गाणं II
==========
तू लेवून घेशील
जर धरणीचं लेणं..
तर आवडेल मला ही
पाऊस होणं..!!
मोहक असेल गं
तुझं चिंब भिजणं..
भावेल मनास माझ्या
तुझं आरक्त लाजणं..!!
नेत्री सजेल
सप्तरंगी इंद्रधनूचं फुलणं
अन वेड लावील जीवास
तुझं धुंद दरवळणं..!!
जीवन व्हावं
एक सुरेल पाऊस गाणं..
कधी रिमझिम तर कधी धुंद बरसणं..
धरणी, पावसासारखं एकरूप होणं..!!
***सुनिल पवार...✍
No comments:
Post a Comment