|| गुंता ||
======
सापडत नाही
काही प्रश्नांची उत्तरं
मात्र प्रश्नांची सल
मनास सतावत राहते..
अन मग
मन मात्र उत्तराकडे
प्रश्नार्थक नजरेने पाहते..!!
कळत नाही का..?
सागर उधाणतो
कधी कधी,
किनारा ध्वस्त करतो..
तरीही हा सागर
न जाणे का मनास भावतो..?
अन
तो क्षतिग्रस्त किनारा..?
तो ही तसाच स्थितप्रज्ञ
तो तरी कुठे,
तुसभरही मागे सरतो..??
नदीचे वागणे अन वाहणे
तेही तसेच दिसते
खरे तर
ती पावसाचे देणं
अन धरेचं लेणं असते
तरीही तिचे सागराकडे
हटकून वळणे असते..!!
कळत नाही का
स्वतःचे अस्तित्व हरवून
कशासाठी हे विरघळणे असते..?
अन सागराचे मात्र
बेफिकीरीचे उधाणणे दिसते..!!
का असेच
हे प्रश्नार्थक जगणे असते..?
अन उत्तरांचं आपल्याचं प्रश्नात,
गुरफडणे असते..?
जसे
दिव्यासाठी
वातीचे जळणे असते..?
तसं दिव्याचं ठीक आहे हो
निदान तो वातीच्या समीप आहे
पण मग पतंगाचे काय?
त्याचे का नाहक होरपळणे असते..?
***सुनिल पवार...✍

No comments:
Post a Comment