Wednesday, 17 May 2017

|| कधी कधी ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| कधी कधी ||
==========
कधी कधी ती म्हणते
मिटून बघ डोळे
अन
सांग तुला कोण दिसते..?
मी मिश्किल म्हणतो तिला
लोक म्हणतात,
ध्यानी मनी ते लोचनी दिसते..
मग सांग
माझ्या मनात कोण वसते..??

ती रुसते म्हणते,
वाटलंच होतं,
तू सरळ सांगणार नाही
हरकत नाही
मलाही काही घाई नाही..
मी तसाच मिश्किल हसतो
अन म्हणतो,
मला माहित आहे ग
ऐकल्या शिवाय काही
तू हट्ट सोडणार नाही
आणि तो पर्यंत
तू काहीच बोलणार नाही..!!
ती गंभीर होते,म्हणते
जरी घेतलं तू नाव कुणाचं..?
तरी मी काहीच बोलणार नाही
इतकंच की,
जरा वाईट वाटेल
पण मी खचणार नाही..
मग मी ही गंभीर होती
उत्तरतो,
तुझं खचणं,
तसं मलाही रुचणार नाही
तुझ्या मौनात,
मला काहीच सुचणार नाही..
आणि खरं सांगू
तुझ्याशिवाय कोणी दिसणार ही नाही..!!
आता
ती निवांत
मी ही निवांत
पण समजू नका हं, संपलीय भ्रांत
काही सांगता यायचं नाही
पुन्हा कधी येईल
ही "कधी कधीची" संक्रात..!!
***सुनिल पवार...✍🏽😊

No comments:

Post a Comment