|| मधुप्याला ||
=========
देखोनी त्या फुलास
मनी गुलमोहर फुलला..
छेडीता सहज त्यास
मुक्त गाली उतरला..!!
लाजरीच्या पानास
अवचित स्पर्श केला..
मिटल्या लोचनातील
रंग गहिरा झाला..!!
वेडा भ्रमर मोहित
फुलावरी विसावला..
प्रेमाचा मधुप्याला
रिचवून तृप्त झाला..!!
***सुनील पवार...
✍🏽
No comments:
Post a Comment