Sunday, 19 March 2017

|| बदल ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| बदल ||
=======
आज ती खुश भासली
म्हणाली,
बदलतोय पुरुष
बदलतेय मानसिकता..
किंचित का होईना
तो रुजवू पाहतोय
प्रगल्भता..!!

मी हसलो म्हणालो
तसा तो असतोच मुळात
पण अडकून पडतो
नाहक
पुरुषी अहंकारात..
पिढ्यान पिढ्या रुजलेल्या
कुळाचाराच्या कवच कुंडलात..
कुणीतरी
काढून घ्यायला हवीत
त्याची कवच कुंडले हळुवारपणे
तुला ते जमेल
इतकी प्रगल्भता आहे
केवळ तुझ्यात..!!
आणि
कसं आहे ना..
तुझंच बोट धरून
तो पहिलं पाऊल टाकतो..
तुला कळतंय नेमकं
तो कुठे चुकतो..?
मागची नाही घडली
पुढची पिढी नक्की घडेल..
तू ठेव अशी जरब त्यावर
काय बिशाद आहे
पाऊल कुठे वाकडं पडेल..!!
***सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment