गुलमोहर...
तो नेहमीच दिसतो
सूर्य डोक्यावर घेतलेला
रस्त्याच्या कडेवर
एकटा निश्चल उभा..
प्रतिसुर्य भासतो जणू
परी अंतरी त्याच्या
अमृत सावलीचा गाभा..!!
सूर्य डोक्यावर घेतलेला
रस्त्याच्या कडेवर
एकटा निश्चल उभा..
प्रतिसुर्य भासतो जणू
परी अंतरी त्याच्या
अमृत सावलीचा गाभा..!!
कोकिळा खेळते
त्याच्या अंगा खांद्यावर
कुहू कुहू छान गाते..
असे वाटते,
त्याचं मन तिलाही कळते
म्हणूनच कदाचित
ती अलवार सुरांची फुंकर मारते..!!
त्याच्या अंगा खांद्यावर
कुहू कुहू छान गाते..
असे वाटते,
त्याचं मन तिलाही कळते
म्हणूनच कदाचित
ती अलवार सुरांची फुंकर मारते..!!
लोक म्हणतात,
अन् मीही पाहिलंय
युगा युगांपासून तो
तसाचं उभा दिसतोय..
आजही त्याने
आपलं हृदय अंथरलंय
न जाणे हा "गुलमोहर"
कोणाची वाट पाहतोय..?
अन् मीही पाहिलंय
युगा युगांपासून तो
तसाचं उभा दिसतोय..
आजही त्याने
आपलं हृदय अंथरलंय
न जाणे हा "गुलमोहर"
कोणाची वाट पाहतोय..?

No comments:
Post a Comment