Friday, 10 March 2017

|| जोतीबांची ज्योत ||

|| जोतीबांची ज्योत ||
==============
तू घातले
पदरात स्त्रियांच्या
पारिजातकाचे
साक्षर गंधित सडे..
न जाणली तुझी महती
कर्मठ त्या मूर्खांनी
तुज मारिले तयांनी
शेण,चिखल,खडे..!!


निश्चयाचा महामेरू
जणू
तू राहिलीस ठाम
आपल्या ब्रिदावर..
जोतीबांची
तू ज्योत प्रकाशित
चालली,
हसत सहज
खडतरशा मार्गावर..!!

तू सोसले बहू
परी न खचली
उसळून उठली
तुज कडून घ्यावे
सकल नारींनी
धडे..
तू चारले तसेच चारावे
ह्या उन्मत्त समाजास
आपल्या कृतीतून
खडे..!!

तू लाविले रोप तेव्हा
शिक्षणाचे
आज फोफावले
वट वृक्षात विशाल
रूपांतरीत झाले..
साक्षर झाली मुलगी
ह्या देशाची
तीने घेतली बघ
गगन भरारी
वंदित माउली तुझी पावले..!!
***सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment