वैधानिक इशारा :
खालील चित्राशी सुसंगत अथवा विसंगत चित्र इतरत्र आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. अथवा चित्रकाराच्या कुंचल्याचा उमटलेला फटकारा समजावा..चित्राच्या रंगसंगतीचा आपण आपल्या परीने अनुमान काढावा..चित्रकार कोणाच्याही प्रश्नास उत्तर देण्यास बांधील नाही ह्याची नोंद घेऊन..चित्राचा पुरेपूर आनंद घ्यावा
धन्यवाद..
===========
चित्र
===========
चित्र लै वंगाळ (ई)चित्र
पैका द्या, अन पुरस्कार घ्या..
प्रकाशनाची बातच सोडा
हार, फुले, अन सत्कार घ्या..!!
प्रति(निधी)क ची येगळी टूम
दृष्टी पल्याडचं होतंय झूम..
जमतेय की हो मुबलक माया
फळका मारू ठोकू धूम..!!
स्पर्धेचं भौ लै वाटतंय भेव
जिकडं तिकडं फुटलंय पेव..
वाढपीचा कुठं पत्ताच न्हाय
म्हणती गड्या पोटभर जेव..!!
'समदं असतंय अखिल भारतीय
कुठं खुलं, कुठं जातीय..
रंगमंच ह्यो फिरता हाय
अन नाटक मातूर अनाकलीय..!!
****सुनिल पवार...

No comments:
Post a Comment