Sunday, 19 March 2017

|तुझ्या आठवणीत

तुझ्या आठवणीत..

तुझ्या आठवणीत कधी
बैसतो क्षणभर सागर किनारी..
गुज सागराशी करतो
अन लाटेस मिळते उभारी..!!

तुझ्या आठवणीत कधी
सहज फुलांशी दोस्ती केली..
गुज भ्रमराशी करता
खुलते मन पाकळी पाकळी..!!

तुझ्या आठवणीत कधी
सूर्यास डोक्यावर धरले..
गुज करता गुलमोहराशी
त्याने हृदय लाल अंथरले..!!

तुझ्या आठवणीत सखे
मन वाऱ्यावर भरकटले..
गुज करता लेखणीशी
बघ कागदावर उमटले..!!
--सुनिल पवार..✍🏽
(आगामी कादंबरी"अभाग्याचं राजस भाग्य" मधील रचना)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-70


No comments:

Post a Comment