Tuesday, 5 February 2019

ना शब्द बोलले...

ना शब्द बोलले...
आपल्या मनाशी
बहु वाद झाले..
ना कुणी ऐकले
ना शब्द बोलले..!!
संभ्रमी पडले
कोडे न सुटले..
स्वप्न हे तुटले
ना शब्द बोलले..!!
मन आक्रंदले
अश्रुत भिजले..
ओठात थिजले
ना शब्द बोलले..!!
नकोच ते वाद
मौन माझे भले..
मनही शिणले
ना शब्द बोलले..!!
***सुनिल पवार..✍️

No comments:

Post a Comment