Tuesday, 5 February 2019

का सांभाळतोय..

का सांभाळतोय..
जराशी चूक होते
पण माझं मन मला खाते..
तुझं गणित वेगळं असते
तुला सोयर सुतक नसते..!!
मी गुरफडतो माझ्या प्रश्नात
सोडवणे मज जटिल होते..
पण तुझं उत्तर तयार दिसते
हे वागणे जरा कुटील भासते..!!
मला जमत नाही दिखावा
माझ्या अंतरी तेच बाहेर असते..
पण न जाणे तुला कसे जमते?
तू वेड पांघरून पेडगावला जाते..!!
मला कळत नाही तरीही
मी का सांभाळतोय बेगडी नाते..
जरी लाजरीचे रोप तुझे
तुझ्या अंतरी तरी बोचरे काटे..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment