Tuesday, 5 February 2019

मी ठरवलंय..

मी ठरवलंय..
मी ठरवलंय आता शांत राहायचं
काय घडतंय हे केवळ पाहत राहायचं..!!
मग कितीही असू दे उद्रेक मनात
भस्म होईना का कोणी क्षणात
आपण ग्रीष्मातही शिशिर व्हायचं
काय घडतंय हे केवळ पाहत राहायचं..!!
मला नाही साधायची कोणती संधी
आणि व्हायचंही नाही कोणाचा नंदी
पण आता केवळ मौन बाळगायचं
काय घडतंय हे केवळ पाहत राहायचं..!!
तुमचं चालू द्या हो बिनबोभाट कार्य
पण कृपा करा मागू नका सहकार्य
नैतिक अनैतिकतेत मी कशाला पडायचं
काय घडतंय हे केवळ पाहत राहायचं..!!
हे नक्की फुगला फुगा फुटणार आहे
साबणाचा बुडबुडा किती टिकणार आहे
समजलं असेल तर इतकंच समजायचं
काय घडतंय हे केवळ पाहत राहायचं..!!
***सुनिल पवार....✍️

No comments:

Post a Comment