Tuesday, 5 February 2019

बहर पाहता...

बहर पाहता...
पानगळ होऊन जेव्हा
नवी कोवळी पालवी फुटते..
तेव्हा कूस बदलता ऋतूची
किरणांचं नवं सोनं लुटते..!!
गुलाबी थंडीचा शिशिर मग
धुक्याची चादर हळूच ओढतो..
अन् वसंताच्या चाहुलीने
कोकिळेला सुरेल कंठ फुटतो..!!
गुलामोहराला लाली येता
पळस लाल पेटून उठतो..
बहावा हळदीत रंगता
पांगेऱ्यालाही रंग चढतो..!!
सोनचाफ्याच्या धुंद गंधात
ऋतू उन्हाचा गंधित होतो..
पानाफुलांचा बहर पाहता
तुझ्या छायेचा मज मोह होतो..!!
***सुनिल पवार....✍️

No comments:

Post a Comment