Tuesday, 5 February 2019

माणूस...

माणूस...
ओठात एक आणि पोटात एक
हे धोरण जरा दुटप्पी दिसते..
ही कोणती अवलाद म्हणावी
कधी अमृत, कधी गरळ ओकते..!!
प्रश्न पडतो मानस माझ्या
हा कोण प्राणी जन्मास आला..
चेहरा तर दिसतो सोज्वळ हसरा
मग पाठीमागून कसा डसला..!!
कुठे तोंड अन् कुठे बुड तो
हे कुठून आले ध्यान म्हणावे..
किती मधाळ दिसते त्याची वाणी
का तोकडे माझे ज्ञान म्हणावे..!!
मग कळले उत्तर माझे मला
मी चष्मा स्वार्थी जेव्हा चढवला..
अरे हा तर प्राणी अपल्यातलाच
लोकं माणूस म्हणतात त्याला..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment