Friday, 2 September 2016

|| कावीळ ||

|| कावीळ ||
========
वेळीच सावध व्हा
साथीचा आजार बळावतोय..
मलेरिया, डायरिया
काय घेऊन बसलात
तो काविळीचा रोग
अधिक घातक ठरतोय..!!

निघून गेलेत आता
कावीळ झाल्यावर
पिवळे दिसायचे दिवस..
रंग बदललाय काविळीने
केसरी, हिरवा, निळा
अशा तऱ्हेतऱ्हेच्या
विषाणूंच्या दिशेने
सुरु झालाय त्याचा प्रवास..!!
पूर्वी
मात्र लिव्हरवर आघात करायचा
हा काविळीचा रोग
आता संपूर्ण शरीरावर
अन मनावर करतोय
पोखरून काढतोय
पिढी दर पिढी
अन डॉक्टरही बसलेत
ठेऊन हातावर घडी..!!
आता रोगीच करतोय
आपल्या परीने इलाज
एका रंगाची लस
दुसऱ्या रंगास टोचत आहे
अन रोगापेक्षाही इलाज
जालीम ठरतोय
हे शल्य माझे
मलाच नित्य बोचत आहे..!!
***सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment