हल्ली व्हाट्सअपवर मयताचे फोटो टाकण्याचे नवीन खूळ आले आहे..लोक मृताचे
सोपास्कार पार पाडायचे सोडून आधी स्टेटस टाकून आपल्या आपल्या अल्पबुद्धीची
जाणीव करून देतात..तेव्हा खरच त्यांची कीव येते...स्वतःला विज्ञान युगी
म्हणवणारा माणूस किती खालच्या पातळीवर घसरला आहे ह्याची प्रचीती त्यांच्या
कृत्यातून येते..असा कर्तव्यहीन कृतीवर प्रकाश झोत टाकणारी खालील कविता
अवश्य वाचा आणि आपला अभिप्राय कळवा...
धन्यवाद...
=====================
|| प्रणाम तुज व्हाट्सअप बाबा ||
=====================
प्रणाम तुझ व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..
पाडले स्टेटस सोपस्कार
बांधले कमेंट्स चार गठीला..!!
धन्यवाद...
=====================
|| प्रणाम तुज व्हाट्सअप बाबा ||
=====================
प्रणाम तुझ व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..
पाडले स्टेटस सोपस्कार
बांधले कमेंट्स चार गठीला..!!
अवघा जनसमुदाय खोळंबला
देह अग्निसाठी तो तिष्ठला..
पहिला मान व्हाट्सअपला
पाहुन उर माझा फाटला..
प्रणाम तुझ व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..!!
झाली तिरडी बांधून
व्हाट्सअपची कमेंट सांधुन
हार फुलात सजला
फ़ोटो झकास काढीला..
प्रणाम तुझ व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..!!
दिला अग्नी पेटली चिता
पुन्हा सतावे स्टेटस चिंता..
शोकसभेचा संदेश धाडीला
वाचकास असे धरले वेठीला..
प्रणाम तुझ व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..!!
म्हणती जन मोक्ष मिळाला
देह सदेह स्वर्गी वळला..
व्हाट्सअप बाबा कृपा तुझी
सोहळा याची देही देखिला..
प्रणाम तुज व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..!!
*****सुनिल पवार......
देह अग्निसाठी तो तिष्ठला..
पहिला मान व्हाट्सअपला
पाहुन उर माझा फाटला..
प्रणाम तुझ व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..!!
झाली तिरडी बांधून
व्हाट्सअपची कमेंट सांधुन
हार फुलात सजला
फ़ोटो झकास काढीला..
प्रणाम तुझ व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..!!
दिला अग्नी पेटली चिता
पुन्हा सतावे स्टेटस चिंता..
शोकसभेचा संदेश धाडीला
वाचकास असे धरले वेठीला..
प्रणाम तुझ व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..!!
म्हणती जन मोक्ष मिळाला
देह सदेह स्वर्गी वळला..
व्हाट्सअप बाबा कृपा तुझी
सोहळा याची देही देखिला..
प्रणाम तुज व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..!!
*****सुनिल पवार......

No comments:
Post a Comment