Saturday, 2 May 2015

।। अर्थ प्रेमाचा ।।

|| अर्थ प्रेमाचा ||
**************
बऱ्याच वर्षानी आज
तिची अन माझी भेट झाली
वाटेत ती समोर आली
नजारा नजर थेट झाली..!!

पाहताच मज समोर
नजर तिची खाली झुकली
सहज विचारले तिला
काय ग ओळख विसरली..??

उत्तरली मज नाही रे
कसे विसरु शकते तुला
कोण विसरलय सांग ना
आजवर पहिल्या प्रेमाला..!!

ऐकून तिचे ऊत्तर
क्षणभर न पटले मनाला
मग का सोडून गेलीस अर्ध्यावर
प्रश्न मी केला तीज दुसऱ्या क्षणाला..!!

ऐकून माझा भडिमार
पाणी आले तिच्या डोळ्याला
म्हणाली व्यवहार पाहिला रे मी
तिलांजली दिली प्रेमाला..!!

मग आता खुश आहेस ना
पुन्हा मी प्रश्न केला
उसने हसली अन उत्तरली
तोटा नाही रे पैशाला..!!

तू कसा आहेस
प्रश्न आता तिने केला
म्हणालो मी
लोळतोय प्रेमाच्या राशीत
नाही भुकेला मी पैशाला..!!

उधळतोय दोन्ही हातांनी प्रेम
नाही तोटा समाधानाला
तुझ्या वाट्याच प्रेम
देतोय आता सहचारणीला..!!

अजूनही वाहत होत्या गंगा यमुना
बांध मानाचा फुटला होता
माझ्या उत्तराने कदाचित तिला
प्रेमाचा अर्थ खरा कळला होता..!!
***********सुनिल पवार.....
02/05/2015 - 11:30pm

No comments:

Post a Comment