Sunday, 10 May 2015

|| कशी होती माझी आई ||

|| कशी होती माझी आई ||
********************
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ऐकली मी आई
नाही अनुभवली
दिले कोणी प्रेम
त्यात मज दिसली..!!
🌹🌹🌹🌹🌹
विचारले ज्याला
म्हणे देवाघरी गेली
सांग रे देवा
अशी घाई का केली..!!
🌹🌹🌹🌹🌹
हक्क होता तो माझा
का असा हिरावला
आई वीना लेकास
का पोरका केला..!!!
🌹🌹🌹🌹🌹
म्हणतात लोक सदा
तू आई वीना भिकारी
म्हणून का रे घेतलीस
माझी मायेची भाकरी..!!
🌹🌹🌹🌹🌹
अश्रु माझे पुसणया
कुठे शोधु आई
इतके तरी साग देवा
कशी होती माझी आई..!!
🌹🌹🌹🌹🌹
*****सुनिल पवार.....
|| मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

No comments:

Post a Comment