Wednesday, 6 May 2015

II जगुन बघ तू सकारात II

II जगुन बघ तू सकारात II
*************************
वाट पहातेस तू माझी
नजर का तुझी शून्यात..
भान नसे तुझ कसले..
रमतेस आपल्याच भाव विश्वात..!!

नेहमीच येतो मी..
उभा असतो तुझ्या दारात..
पाहत नाही मज कधी..
असतेस तू सदा विरहात..!!

अश्रु तुझ्या डोळ्यात..
तुज दिसे सारे धूसर..
असुनही मी मनात
का शोधते ती नजर..!!

झटकून टाक मळभ
उजळेल बघ आकाश
सोड नकाराची कास
भर होकर तू दिलखुलास..!!

काय ठेवले त्या नकारात
अंधकार वसतो ग त्यात..
धर हात तू सकाराचा
जगुन बघ तू सकारात..!!
********सुनील पवार.....

No comments:

Post a Comment