Thursday, 7 May 2015

II वेदना / संवेदना II

II वेदना / संवेदना II
**********
जाणून घेण्या वेदना
मी गेलो तिच्या जवळ..
कळली मज जी काही
मी मांडतो तुम्हा जवळ..!!

वेदनेचे असते मनाशी नाते
मनास असते वेदनेची कळकळ..
वेदनेने होते मन ते विव्हळ
वेदनेचेही असते मनास पाठबळ..!!

वेदने पॉटी जन्मते पीड़ा
वेदना निर्मीते मनात वादळ..
करते कधी मनाचा छळ..
कधी देते जगण्यास बळ..!!

कणव सुद्धा असते वेदनेच्या मनी
जी करते मना मनास जवळ..
वेदनेलाही जागवते सवेदना
वेदनाच असते प्रीतीचे सुफ़ळ..!!
*********सुनील पवार.....

No comments:

Post a Comment