Sunday, 10 May 2015

।। आईवरचं प्रेम ।।

आईवरचं प्रेम...
आईवरचं प्रेम तुझं, आज नेटवर उफाळून येतंय..
घरात मात्र तुझी आई, रोजचंच दळण दळतेय..!!
तू न सांगताही बाळा, तिला तुझं दुखः कळतंय..
तुझ्याच सुखासाठी तिचा, जीव असा तळमळतोय..!!
भाकरी करपु नये म्हणून, ती बोटं आपलं जाळतेय..
अन् तू गीळताना म्हणतो, आई तुला काय कळतंय..!!
तुझ्या प्रेमाचं बेगडी वारु, आज नेटवर जे उधळतंय..
ते पाहून रे वेड्या, माझं मनही आता मलाच छळतंय..!!
--सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment