Monday, 6 January 2014

II आजची पत्रकारिता II


नमस्कार,
पत्रकार दिनाच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा....!!

II आजची पत्रकारिता II

आजची पत्रकारिता सांगा..
निर्भिड कुठे राहिली..
निष्ठा मात्र ह्यांनी..
पैश्यापुढ़े वाहिली..!!

राजकीय दावणीला..
बांधले सारे वळू..
बीनकामाचे सत्र छापू..
महत्वाचे टाळू..!!

कालचे पत्रकार पहा..
झाले आज खासदार..
राजकीय हेतु जपत..
करती राजकीय प्रहार..!!

फारच कमी उरलेत..
निपक्ष निर्भिड पत्रकार..
बाकीचे मशगुल सारे..
निवडण्यात सरकार..!!

*चकोर*
 

No comments:

Post a Comment