II चौथा कोन (कोण) II
चंगु आणि मंगू दोघे मित्र..तशी फारशी घनिष्ट मैत्री नसली तरी बा-यापैकी एकमेकांना ओळखत होते..तसे दोघेही अव्वल टपोरी तासंतास नाक्यावर गप्पा मारत उभे असायचे..त्यातूनच ह्या दोघांची ओळख वाढली होती..शिवाय चंगुला रात्री जेवण झाल्यावर फेरफटका मारायची सवय होती..शिरस्त्याप्रमाणे तो मंगुच्या गल्लीतून एक फेरी मारत असे..मग मंगुशी थोड्या गप्पा मारून परत आपल्या नाक्यावर येत असे..मग गप्पांचा फड तिथेच रंगत असे..
असा हा चंगु एका रात्री मंगुच्या गल्लीतून जात असता अचानक त्याची नजर पिंकीवर पडते..पिंकीला पाहताक्षणी प्रथमदर्शनी प्रेम का काही म्हणतात तसं काहीस झाल चंगुच..
पिंकी नव्यानेच तिथे रहायला आली..मुळची ती साउथची नाकी डोळी छान, सावळी, रेखीव आणि तिचा तो विशिष्ट पेहराव पाहून चंगु चक्क प्रेमात पडतो..
आता चंगुच्या फे-या मंगुच्या गल्लीत वाढू लागल्या..रोजच्या कट्ट्यावर तो अधून मधून कधीतरी दिसत होता..जास्तीत जास्त वेळ तो मंगुच्या गल्लीच्या नाक्यावर दिसू लागला..काय करणार प्रेमात जो पडला होता..मंगुच्या नजरेतून हि गोष्ट काही सुटली नाही भले चंगुने कितीही लपण्याचा प्रयत्न केला असेल..पण मंगू सुद्धा काही कमी नव्हता..त्याने चटकन ताडल पाणी कुठे तरी मुरते आहे..पण विचारणार कस..?? समोर तर चंगु होता..आणि अलीकडे चांगली मैत्री झाली होती..मग उगाच राडा नको म्हणून तो सुद्धा काही बोलला नाही..
एके दिवशी सहज गप्पांच्या ओघात मंगुने विषयाला हात घातलाच..पहाच काय संवाद घडाला दोघात..
मंगू : (हसत) काय रे चंगु..अलीकडे तू तुझी गल्ली सोडून इकडे जास्त यायला लागला..काय भानगड काय आहे..
चंगु : (हसतच) भानगड काही नाही रे..पहिल्यापासूनच येतो ना..मग..
खर तर चंगु प्रश्नाने थोडा बिचकलाच होता..पण अशा प्रसंग येणार हे त्याने आधीच ताडल होत..
मंगू : पण या आधी तुझी एकचं राउंड व्हायची क्वचित कधीतरी दोन..पण अलीकडे तर मोजमाप नाही राहील..
चंगु : तसं विशेष काही नाही रे..तिकडे गल्लीजवळ हल्ली कोणी नसत म्हणून बाकी काही नाही..
मंगू : नाही सांगायचं तर राहील..मी आपल सहज विचारलं हा राग बिग काय मानू नको यार..(मिश्किलपणे) तसंच काय असेल तर सांग आपल्याकडून काय मदत झाली तर..
चंगु : आता तू गळ घालतो तर सांगतो..तसं पण मैत्रीत काय लपवायच यार..ती तुमच्या गल्लीत नवीन पोरगी आली आहे ना..जबरदस्त आयटम आहे यार..तुला सांगतो हि जर हो म्हणाली ना तर तर लाइफ़ सेटल..
मंगू : कोण पिंकी..??
चंगु : पिंकी नाव आहे का..झकास नाव हाय यार..
(हे ऐकून मंगुचा चेहरा पांढरा फट्ट पडतो..चंगुच्या नजरेतून हि गोष्ट सुटत नाही..)
चंगु : काय रे मंगू काय झाल..?? एकदम नर्वस का झाला..??
मंगू : काही नाही यार तुला पण हीच मिळाली प्रेम करायला..??
चंगु : म्हणजे तू सुद्धा लाईनीत..??
मंगू : हा यार आल्यापासून आपला डोळा आहे तिच्यावर..लई भारी आहे..लाइफ़ मध्ये पहिल्यांदा एक पोरगी आवडली त्यात पण तू टांग अडवली..
चंगू : म्हणजे तुला ती पटली..??
मंगू : नाही ना विचारलाच नाही अजून..डेरिंग होत नाही यार..तुला पटली का..??
चंगू : नाही ना..(लगेच सावरत) म्हणजे उत्तर यायच आहे..
मंगू : (हायसे वाटत) म्हणजे अजून पटली नाही तर..
चंगु : (मिश्किल पणे) पटेल यार जाईल कुठे मला नाही पटली तर तुला तरी पटेल..?? आणि एका मुलीमुळे कशाला हवाय राडा नाही का..
मंगू : हा यार चालेल तेरी मेरी यारी बाकी +++ गेली दुनियादारी..हा हा हा..
तर सगळा प्रकार असा आहे..इकडे पिंकी ह्या प्रकाराबद्दल पूर्णतः अंधारात आहे..हा तसा एकदा चंगुने विचारायचा प्रयत्न केला होता..पण त्यात चंगु स्वतःच अर्धमेला झाला होता..मारामाऱ्या करणारा चंगु इथे मात्र आपटला होता..पिंकीच हे दहावीच वर्ष होत सहाजिक ती अभ्यासात गढून गेली होती..प्रिलिम संपल्यामुळे ती घरीच होती त्यामुळे मंगू सुद्धा मोकळाच होता..म्हणजे आता त्याला मागे मागे फिराव लागत नव्हत..पण गल्लीत मोक्याच्या जागेवरून त्याची टेहळणी चालूच होती..चंगु शिरस्त्याप्रमाणे चकरा मारत होता नयनसुख घेत जात होता..दिवस असेच जात होते...
बघता बघता परीक्षेचा दिवस येउन ठेपला..परीक्षा पिंकीची होती..पण कसोटी मात्र चंगु आणि मंगुची होती..प्रेमाच्या परीक्षेत जे पास व्हायचं होत..पाहीला पेपर संपला दिवस फुकटच गेला..नंतर दुसरा तिसरा तरीही गाडी तिथेच होती..चंगु आणि मंगू एकाच नावेचे प्रवाशी होते..ना..म्हणून..उद्या शेवटचा पेपर आणि पिंकीला विचारायचा शेवटचा दिवस..कसा योग जुळावा काही कळेना..शेवटी युती करून काम करायचं ठरते..पहा काय युतीचे अजेंडे आहेत ते..
चंगु : यार मंगू शेवटचा पेपर आला तरी पोरगी काय भेटत नाय..ना तुला भेटली ना मला भेटली..भानगड काय..??
मंगू : हा यार मला पण समजेनास झालंय रोज बस मधून जातो मागून पण हिम्मत होत नाही काय करू..समजत नाही..
चंगु : मी जर बस मधून गेलो असतो ना तर झटक्यात विचारलं असत..आता आहे म्हणून मी जात नाही इतकचं..
मंगू : (नाराज होत) मग उद्या शेवटचा पेपर आहे ना उद्या तू जा..
चंगु : तसं नाही रे..मला म्हनायाच आहे काही तरी करून डेरिंग केलीच पाहिजे..आपण एक काम करू..उद्या पेपर सुटला कि तिला गाठू आणि विचारून टाकू एकदाच..पेपर संपल्यामुळे कदाचित म्हणेल हो..
मंगू : हा चालेल पण एकत्र कसे जाणार दोघे..??
चंगु : एकत्र नाही जायचं वेगवेगळे जायचं..मी थांबतो शाळेजवळ..आणि तू थांब बस स्टॉपवर..
मंगू : त्याने काय होणार..तू तिला घेऊन जाणार आणि मी बोंबलत बसणार होय..??
चंगु : अरे तसे नाही ऐक..जर ती मला शाळेजवळ भेटली तर मी विचारेन..आणि हा म्हणाली तर तर तुला स्टॉपवर आल्यावर कळेलच ना.. मग तू कलटी मारायची हा तिथून..
आणि समज एकटी आली स्टॉपवर तर समजायच माझा पत्ता कट..काय कळले ना..??
मंगू : चालेल हे ठीक आहे...ठरल तर मग..
दोघेही मनात मांडे खात उद्याची वाट पाहत आपआपल्या कट्ट्यावर निघतात..
चला आज शेवटचा पेपर प्लानिंग परिपूर्ण झाली आहे..बघुया चंगु मंगू काय प्रताप करतात ते..
तर ठरल्या प्रमाणे दोघांनी आपली मोक्याची ठिकाण हेरून जागेवर ठाण मांडून बसले..पेपर सुटायला अवघी पंधरा मिनिटे राहिली..चंगुची धडधड वाढू लागली..वेळ समीप येत होती तशी चंगुच्या हृदयाने वेग मर्यादा ओलांडली होती आता तर राजधानी सुद्धा मागे पडेल कि काय असंच वाटू लागले होते..शेवटची घंटा झाली..मुल सारी बाहेर येऊ लागली..चंगुची नजर पिंकीच्या वाटेवर लागली..तिला शोधत भिभिरु लागली..पण हे काय..?? पिंकी कुठे आहे..सगळी मुल गेली पण पिंकी कुठे नाही दिसली..शाळा सुटून अर्धा तास झाला अजूनही पिंकी कशी नाही आली..हि चिंता चंगुला सतावू लागली..आता मात्र त्याचा धीर सुटला..काहीसा हिरमुसला..जड अंतकरणाने तेथून परतला..पोरिन पार राडा केला होता ना..आता कोणत्या तोंडाने मंगुकडे जायचं..?? राहून राहून हाच प्रश्न जास्त सतावत होता..नको त्या लफड्यात पडलो आणि पुरती नाचक्की झाली यार..अशीच त्याची धारणा झाली..मंगुने पोरीला गटवली असणार असा समंज करून तो निघाला थेट चौपाटीवर पोहचला..बराच विचार विनिमय करून संद्याकाळी घरी जायला निघाला..
आता पाहू इकडे मंगुच काय झाल..??
मंगुची अवस्था काही फारशी वेगळी नव्हती त्याचा ही पोपट झाला होता पोरगी काही स्टॉपवर आली नाही..चंगुने पटवली बहुतेक असा समज करून तोही घरी निघाला..गल्लीत येऊन त्याने कानोसा घेतला तर पिंकी घरी नव्हती..म्हणून मग कट्ट्यावर गेला चंगु सुद्धा तिथे नव्हता..आता त्याचा पक्का समंज झाला की चंगुने आपला पोपट केला..
इकडे संध्याकाळी चंगु परतला मनात विचार केला आज शेवटच तिला पाहून जावू आणि मंगुला सुद्धा शुभेच्छा देऊ जड अंतकरणाने निघाला..पण गल्लीच्या टोकावर टाकलेलं त्याच पाउल तिथेच थबकते..समोर पिंकीला पाहून दंग होतो..तोच शाळेचा ड्रेस आणि तीच बॅग पाहुन हैराण होतो..नुकतीच गल्लीच्या वळणावर ती घराच्या दिशेने वळत असते..त्याच्यात आणि तिच्यात जेमतेम दहा विस फुटाच अंतर असेल..मनात विचारांच काहूर सुटते..ही जर एकटी इथे मग मंगू कुठे आहे..?? नक्कीच तो दुस-या मार्गाने घरी गेला असणार..ठीक आहे झाल ते झाल आता आल्या प्रसंगाला सामोर तर जायला पाहिजे..मनाचा हिय्या करू तो तिच्या मागोमाग गल्लीत शिरला..समोर मंगू त्याच्या दारात खुर्ची टाकून बसलेला दिसतो..चंगु सरळ चालत एक चोरटा कटाक्ष पिंकीच्या घरात मारून मंगुच्या दिशेने निघाला..बहुतेक मंगू त्याचीच वाट पहात बसला होता..चंगुला पाहताच तो उठला..खिन्न मनाने म्हणाला बस काय चंगु हीच काय दोस्ती..चंगुला हा आणखी एक धक्का होता..चंगु उत्तरला काय झाले मी काय केले..त्यावर मंगू म्हणाला..तुमच्या दोघांच होत तर तसं सांगायचं होत ना..हे नाटक कशाला केल..तुमचं आधीच ठरलं होत ना..?? त्याशिवाय का तुम्ही एकाच वेळी आलात..?? आता मात्र वेड व्हायची पाळी चंगुची होती..मनात म्हणाला म्हणजे पिंकी ह्याच्या बरोबर नव्हती तर..चला नाचक्की टळली ह्या भावनेने चंगुच्या चेह-यावर हलकी स्मितरेष तरळली..ती ही क्षणिक..कारण आता मंगुचा विश्वास मात्र कायमचा गमावून बसला होता..हलकेच मंगुला बाय म्हणून चंगु तिथून परतला..
चंगुच्या मनात मात्र प्रश्नाचं वारूळ निर्माण झाल..असंख्य विचारांनी तो पुरता पोखरला गेला..पिंकी आमच्या दोघांबरोबर नव्हती मग ती इतका वेळ कुणाबरोबर होती..ती मैत्रिणींबरोबर होती..?? की प्रेम त्रिकोणाला कोणी चौथा कोन छेदून गेला..प्रश्न सारे अजूनही अनुत्तरीत आहेत..चंगुने गल्लीत चकरा मारणे बंद केले..मन मात्र अजूनही तिथेच घुटमळते आहे..मंगूने चंगुची साथ कायमची सोडली..चुकून कधी चंगु दिसलाच तर मंगू नजर वळवतो..मंगुला सत्य सांगून टाकण्याच धाडस चंगुला अजून तरी जमलेलं नाही..सगळे प्रश्न मात्र मनात ठेवून चंगुचा मात्र अश्वस्तामा झाला हे सुद्धा तितकेच खरे आहे..मित्रानो हे सुद्धा तितकेच खरे आहे..
धन्यवाद..
*चकोर*

No comments:
Post a Comment