Monday, 6 January 2014

।। मी पेटकर ।।


।। मी पेटकर ।।

साहित्य संमेलनाला गेलो..
आग लावून आलो..
बोलायच जे न बोललो..
पोपट घेवुन जो बसलो..!!

हल्ली आम्ही भविष्य वर्तवितो..
वेळ प्रसंगी कुंडली पाहतो..
कोंग्रेसच्या मार्गा मधील..
आप,ताप भाजप दूर करतो..!!

काव्याच न मज देणे घेणे..
आमचे लक्ष राज्य करणे..
पक्ष श्रेष्टिंचे गुणगान गाणे..
राजकीय पोळी भाजून घेणे..!!

मातब्बर पत्रकार आम्ही..
सांगा आम्हास काय उणे..
लेखणी आमची पेटकरी..
ठावे आम्हास मात्र पेटवणे..!!

*चकोर*
(जेष्ट पत्रकार कुमार केताकरांबद्दल मला आतीव आदर आहे..वरील विडंबन कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित केलेल नाही याची कृपया नोंद घ्यावी..धन्यवाद)
 

No comments:

Post a Comment