Friday, 13 January 2017

|| या बाळांनो या रे सारे ||

औरंगाबादच्या पिंपळखुंटा जिल्हा परिषद उच्च शाळेला iso प्रमाणपत्र घोषित झाले. त्याच्या वितरण सोहळ्यात शाळेच्या मुख्याधिपिका सौ.हेमलता प्रकाश जोशी यांच्या आग्रहाखातर मी लिहलेली "या बाळांनो या रे सारे" ही कविता प्रस्तुत करून त्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली
👇🏽
|| या बाळांनो या रे सारे ||
================
ज्ञान मंदिराचे सच्चे
उपासक आपण सारे..
शिक्षणाची कास धरू
या बाळांनो या रे सारे..!!

अक्षराच्या वृक्षावरती
किलबीलती विविध पाखरे..
झेपावतील आकाशी
या बाळांनो या रे सारे..!!
ABCD अन बाराखडी
धडे गिरवू मोदभरे..
आत्मसात करू सूत्र गणिती
या बाळांनो या रे सारे..!!
इतिहास,भूगोल, विज्ञानाचे
वाहू द्या तनमनातं वारे..
शिकाल तर टिकाल सारे
या बाळांनो या रे सारे..!!
ह्या विशाल नभांगणाचे
स्वयंप्रकाशित तुम्हीच तारे..
उजळून टाकू आसमंत
या बाळांनो या रे सारे..!!
****सुनिल पवार... 

ती सध्या काय करते..?

💝तिच्यातील ती💝
=============
ती सध्या काय करते..?
==============
अचानक ती म्हणाली
काय चावटपणा लावलाय हो
जो तो विचारतोय
ती सध्या काय करते..?
जळलं मेलं लक्षण
नुसत्या चांभार चौकशा
दिसत नाही का तुम्हास..?
फुटलेल्या तुमच्या घड्यात
तीच पाणी भरते..!!

अचंबित मी उत्तरलो
आता हे काय नवीन..?
मी कधी म्हणालो
ती सध्या काय करते..?
आणि
मला माहीत आहे
तू सर्वांसाठी किती करते
तुला करता उणे
शून्याशिवाय काय उरते..?
ती चिडली म्हणाली
माझं तुमचं सोडा हो
मी इतरांसाठी म्हणतेय
जरा फेसबुक,व्हाट्सअप चाळा
प्रत्येकाचं हेच दुखणं दिसतेय
म्हणे ती सध्या काय करते..?
ती मसणात का जाईना..
ह्यांच्या पोटात कशापायी दुखते..?
आता पेटली माझी ट्यूब
मी हसलो उत्तरलो
अगं तू समजते
त्यातला हा प्रकार नाही..
प्रमोशनाचा भाग आहे
बाकी काही नाही..
म्यान कर तलवार
आणि
संपव तुझी लढाई..!!
ती भानावर आली
म्हणाली
असं हाय व्हय.?
जळलं मेलं लक्षण
कळतंच नाही
कोणाचं मन
कधी काय बोलते..
बरं आता मला खरं सांगा
ती सध्या काय करते..??
मी..मूक
🤔😷
****सुनिल पवार...✍🏽 

|| तेव्हा/आता ||

|| तेव्हा/आता ||
==========
तेव्हा
त्याच्या बासरीत
ती सदा रममाण
तिच्या ओठी
सदा त्याचेच नाम..
ती राधा प्रिया त्याची
अन
तो मोहन घनशाम..!!

तेव्हा
तीचा सोज्वळ
सुकोमल स्वभाव
त्याच्या अस्तित्वावर
तिचाच प्रभाव..
ती रुक्मिणी भार्या त्याची
अन
तो कृष्ण सखा माधव..!!
तेव्हा
ती तापट भारी
तिचा हट्ट हेच हत्यार
तो राखण्या तीची मर्जी
दिसतो नित्य तयार..
ती सत्यभामा अभिलाषी
अन
तो निर्मोही मनोहर..!!
तेव्हा
ती समर्पित
त्याच्या पायी
ती विणेची
स्वर करुणाई..
ती निर्मळ मीरा जाई..
अन
तो मुरलीधर ठायी ठायी..!!
आता
ती राधा,रुक्मिणी,
भामा,मीरा
एकाच नदीच्या
अनेक जलधारा..
अन
माधवाने
न जाणे गाठला
कोणता
गुपचुप किनारा..!!
***सुनिल पवार...✍🏽 

|| ती अशीच येते ||

|| ती अशीच येते ||
============
ती अशीच येते नित्य
चंद्र तारका माळून..
रातराणी बहरते
आसमंती गंधाळून..!!

ती बहर पौर्णिमेचा
मी मुग्ध होतो भाळून..
अन ओढ अंतरीची
येते मनी उफाळून..!!
ती वाटेवरची छाया
का लुप्त होते वळून..
ही वेदना अवसेची
जाते हृदय जाळून..!!
रात्र अशीच सरते
जाते निद्रेस टाळून..
जागे अजून लोचन
स्वप्नास कवटाळून..!!
***सुनिल पवार...✍🏽

Monday, 2 January 2017

|| खाचखळगे ||

|| खाचखळगे ||
==========
सूर्यावर आग
अन
चंद्रावरही डाग
असतो..
जीवनातील खाचखळग्याचा
तो तसाच
एक भाग असतो..
प्रत्येकाच्या जीवनात
असेच ठरलेले
खाचखळगे असतात
हे ठावुक असते
आपणास
तरीही..
माणसाच्या मनात
माणासाबद्दल
राग असतो..!!
*****सुनिल पवार...✍🏽😊
🌺सुप्रभात 

Image may contain: text

|| संकल्पाचा प्रकल्प ||

|| संकल्पाचा प्रकल्प ||
===============
आज,आता उपरती झालीय
उद्या नकळत विस्मृतीत जाईल..
आजचा ओसंडणारा डाटा
उद्या नक्की फॉरमॅट होईल..!!
प्रत्येकाकडे असते एखादी
आपली स्वतंत्र सरकारी फाईल..
पण मनाच्या लाल फितीत
ती हळूहळू धूळ खात जाईल..!!
संकल्पाचा प्रकल्प मात्र
उद्घोषणांनी दुमदुमून जाईल..
उद्घाटनही दणक्यात होईल
पण कोनशीला वाहून जाईल..!!
तुमचंच काय हो..?
उद्या माझंही तसंच होईल..
आज अठरावं सरतंय
उद्या एकोणीसवं येईल..!!
***सुनिल पवार...✍🏼
😊Happy New Year😊

|| आयुष्य ||

|| आयुष्य ||
========
आयुष्य म्हणजे एक
खडतर प्रवास..
सुख दुखःचा असतो
संमिश्र सहवास..
अनंत चढ़उतार असतात
ठरलेले मार्गात..
आयुष्यास देतात ते
अनुभव हमखास..!!
***सुनिल पवार...