Thursday, 28 June 2018

|| पावसा सोबत ||

|| पावसा सोबत ||
===========
पावसासोबत येतेस तू
तना मनाला भिजवत..
मी आतुरतो तुज झेलण्यास
अन् तू बसते शब्द तोलत..!!
तशी छोटीच आहे ओंजळ
तरीही रिते मन भरत नाही..
अन् अळवाच्या पानावरती
पाणी काही ठरत नाही..!!
धुंद वाऱ्याचा स्पर्शासवे
ओले तुषार अंगास बिलगतात..
गोड शहारा रोमांच फुलवितो
अन् आठवणी मंद गंधाळतात..!!
कितीतरी वेळ निघून जातो
मी खिडकीत रेंगाळत राहतो..
मनःचक्षुत तुझा चेहरा दिसतो
अन् पाऊस,
पागोळ्यातून गळत राहतो..!!
***सुनिल पवार....✍🏼

|| हायकू पावसाच्या ||

|| चातक पक्षी ||
==========
चातक पक्षी
वणवण करतो 
थेंब दाटतो..!!
पाऊस असा 
रिमझिम पडतो
जीव जडतो..!!
थेंब ईवले
तृणास बिलगले..
मोत्यांचे झाले..!!
भेगा भुईच्या
हळुवार सांधल्या
गंधित झाल्या..!!
तृण कोवळे
भूवरी अंकुरले
पालवी झाले..!!
--सुनिल पवार..✍🏼

Saturday, 23 June 2018

|| चांदण्या ||

 || चांदण्या ||
========
मी जमविल्या
हंडाभर चांदण्या..
प्रत्येक चांदणीच्या 
आगळ्या कहाण्या..!!
तीचे लुकलूकणे
त्याच्या नजरेत भरले..
त्याने जाणूनबुजून
तिला अंधारी ठेवले..!!
तिचे दूर जाणेही
तसे एकाकीच ठरते..
त्याची बेरकी नजर
तिला बरोबर हेरते..!!
पण ती तुटता तुटताही
इच्छित दान देते..
तिच्या भरल्या हंड्यात
उष्ण पाणीच उरते..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| आंबा पिकतो ||

 
|| आंबा पिकतो ||
===========
आंबा पिकतो, रस गळतो
अकलेचे तारे भिडे तोडतो..!!
भिडेच्या बागेत येऊन जा
मनोइच्छित आंबा घेऊन जा..!!
खा पोरी खा आंबा खा
आंब्याच्या पोटी मुलगा पहा..!!
दादला तुजला हवा कशाला?
भिडेचा आंबा ठेव उशाला..!!
बक्कळ पोरं आंब्याच्या झाडा..
अहो डॉक्टर तुम्ही प्रॅक्टिस सोडा..!!
***सुनील पवार...✍🏼

Friday, 8 June 2018

|| हे वृक्षा ||

|| हे वृक्षा ||
=======
दोन झाडे
बेमालूम मिसळली एकमेकात
हे वृक्षा,
किती रुंदावल्यात रे तुझ्या कक्षा..
आम्ही छाटतो आमच्या सावलीस
हे वृक्षा,
आमच्या करणीची तू भोगतो शिक्षा..!!
***सुनिल पवार...✍🏼

हायकू पहाट

हायकू* पहाट

१)
दारात आली
वसुदेवाची स्वारी..
सकाळ झाली..!!

२)
उन्ह कोवळे
धरेस बिलगले
गाव जागले..!!

३)
खग उडाले
दसदिशा पांगले
पोट भुकेले..!!

४)
हंबरे गाय
वासरास पुकारे
व्याकुळ माय..!!

५)
भविष्यासाठी
पायपीट चालली
बिऱ्हाड पाठी..!!
**सुनिल पवार..✍🏼

|| ऐलतीर,पैलतीर ||


|| ऐलतीर,पैलतीर ||
=============
तू सूर्य,तू भास्कर
तुला जाळणे जमते..
हतबलता वसुंधरेस
सहज जाळत जाते..!!
तू पृथ्वी,तू वसुंधरा
तुला जळणं कळते..
चंद्राची शीतलता
आता त्यालाच छळते..!!
तू चंद्र,तू शशी
तू चांदण्यात नाहतो..
सागराच्या उसळण्याचा
तुज अर्थ कुठे कळतो..!!
तू सागर,तू रत्नाकर
तू लाटांशी खेळतो..
सारितेच्या समर्पणाला
अर्थ काय उरतो..??
तू सरिता, तू सागरिका
तू गुंतली दोन किनाऱ्यात..
मी ऐलतीर,मी पैलतीर
सांग कोण माझ्या मनात..??
***सुनिल पवार...✍🏼