Monday, 24 November 2014

।। देवा उघड डोळा ।।

।। देवा उघड डोळा ।।
****************
चिंता साऱ्या माझ्या
देवा तुझ्यावर सोडतो
माझ्या यातनांचा घड़ा
तुझ्या पायाशी फोडतो..!!

वाढले ताट फुढयात जे
मी मुकाट्याने खाल्ले
तू मात्र आपले हात
वरच्या वर झाडले..!!

सहन किती करायचे
हे तुला ही कळू दे
लक्ष तुझे किमान ज़रा
माझ्याकडे वळू दे..!!

सत्वर आता होई जागा
उघड़ तू आपला डोळा
मढयावरच लोणी खाण्या
झालीत बघ भूते गोळा..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Thursday, 20 November 2014

मन

मन..

मन सागर सागर..
कसा लागावा तो थांग।
मनी उठती तरंग
कसे थोपवावे सांग।

मन पाखरू पाखरू
झेप घेई गगनात।
बळ नुरले पंखात
कसे उतरू मनात।

मन आकाश आकाश
लाख चंद्र तारे त्यात।
नाही लागत गं ठाव
कसे भेटू क्षितिजात।

मन मंदिर मंदिर
वसे देव म्हणे त्यात।
फुटे पाझर ना त्यास
किती जोडावे मी हात।
--सुनील पवार..

Monday, 17 November 2014

II बिंदु II

II बिंदु II
********
तुज संबोधू बिंदु..
का म्हणू कृपा सिंधू..
तुज आरंभ म्हणू..
का अंत म्हणू बिंदु..!!

अनर्थ घडे अर्थाचा..
गाळता तुज बिंदु..
शब्द शब्द माळेचा..
अर्थ तूच बिंदु..!!

श्रृष्टित भरुन बिंदु..
नयनात वसे बिंदु..
सूर्य चंद्रात दिसे..
चांदणे तूच बिंदु..!!

जीवन एक बिंदु..
जगतो क्षण तो बिंदु..
वंदितो तुज आधी..
पूर्णत्व तूच बिंदु..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Wednesday, 12 November 2014

II माणूस II



II माणूस II
कोणी म्हणतोय प्रगती..
कोणी म्हणे अधोगती..
जीवनाच्या रहाट गाड्यात..
माणूस देतो स्वतःस गती..!!

दिवासाची काय बात हो..
आता जागून काढतो राती..
स्वःहित जपता जपता..
नष्ट करतो इतर जाती..!!

भरता तुंबडी स्वतःची..
अवनीस करतोय रिती..
झुकवून डोंगर माथे..
उपसली सारी माती..!!

करून नष्ट वनराई..
उभारल्या सिमेंटच्या भिंती..
माणसा तुझ्या हौसेचे..
मोल तरी किती..!!

झाले परागंदा वन्य प्राणी..
लुप्त झाल्या किती जाती..
माणूस नावाच्या श्वापादास..
ना उरली आता कसलीच भीती..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Tuesday, 4 November 2014

।। वृत्ती ।।

। वृत्ती ।।
खेकड्याची वृत्ती आम्ही नाही कधीच सोडणार
वरती चढ़णाऱ्याचे आम्ही पाय अलगद खेचणार..!!

स्वाभिमानी अस्त्र आम्ही आपसात उगारणार
लाचारिची निष्ठा मात्र दिल्लिश्वरी वाहणार..!!

स्वःस्वार्थातच आम्ही नित्य परमार्थ साधणारर
माराठी आहोत आम्ही आम्हास स्वजन बाधणार..!!

अटकेपार झेंडा देशात मराठीचाच फडकणार
दुहिचा शाप इथे आम्हास दुर्दैवाने बाधणार..!!

विचार आहे साधा पण कोण समजून घेणार
आम्हास समजावणारा कोणी पैदा नाही होणार..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

।। संभ्रम ।।



।। संभ्रम ।।
संभ्रमाचे कोड़े मज..
अजुन नाही उलघडले..
मन होते वेडे बावरे..
इतकेच मज समजले..!!

दिवस रात्र स्वप्नाळू..
भास छळू लागले ..
पाऊल त्या वाटेवर..
हमखास वळु लागले..!!

नसता ती समोर..
मन उगाच हुरहुरले..
विचारात तिच्याच मग..
पुन्हा पुन्हा गुरफटले..!!

मित्रांच्या संगतीतही..
मन एकटे वावरले..
पाहता तीज समोर..
का उगाच बावरले..!!

कळेना माझे मलाच..
हे काय असे झाले..
मन सांगे मनास..
मज प्रेम झाले..!!
मज प्रेम झाले..!!
*चकोर*
(सुनिल पवार)