Monday, 9 May 2016

|| सांगा की राव ||

|| सांगा की राव ||
=◆=◆=◆=◆=◆=
प्रश्न पडलाय मला
उत्तर तुम्ही सांगावं
कंच्या कंच्या ग्रुपवर
म्या किती बोलावं..!!

कळना काय बी
कुठं मौन खोलावं
वाजतेय बघा बिन
म्या किती डोलावं..!!
सकाळी का सांजच्याला
कवा ईप्सित साधावं
नेमकं कंच्या येळस
कंच्या देवास स्मराव..!!
देवा की हो सल्ला
म्या काय करावं..
भ्या वाटतंय मला
उगा कोणास बाधावं..!!
😄😊😜
***सुनिल पवार...

|| कागदी घोड़े ||

|| कागदी घोड़े ||
=◆=◆=◆=◆=◆=
वाजविले त्यांनी
श्रेष्टतेचे चौघडे..
पांघरले कोणी असे
कोणाचे कातड़े..!!

दिले सदैव दुसऱ्यास
नैतिकते धड़े..
होते का वजनदार ते
ज्ञानाचे पारड़े..!!
व्यक्ती पुजेचे स्तोम
माजवीले चहुकडे..
पूजलेले देव तसेच
पाषाण कोरडे..!!
चौखुर उधळले बेलगाम
कागदी घोड़े..
खिंकाळले कळले जगा
फसवे ते मुखड़े..!!
🙏🌹🙏🌹🙏
***सुनिल पवार..

|| आरसा ||

|| आरसा ||
=◆=◆=◆=
तुम्हाला म्हणून सांगतो
हल्ली लोक
अरासा घेऊन फिरतात.
नवल वाटले मला
हे नेमके काय करतात..!!

मी पण त्यांच्या मागून
नकळत फिरू लागलो.
कुतूहल।वाटले मला
त्यांच्यात फेर धरु लागलो..!!
आरसेवाला भी पाहिला
अन् आरसा भी पाहिला..
अभिप्रेत असणारा माणूस
कुठेच नाही दिसला..!!
बऱ्याच वेळाने उमगले गमक
हां आरसा नुसताच नावाला आहे
तोच त्यामागे दडलाय
ज्याने आरसा हा दाविला आहे..!!
*****सुनिल पवार....

Tuesday, 3 May 2016

|| अंगठाधार ||

|| अंगठाधार ||
=◆=◆=◆=◆=
थोडक्यात सार
अंगठा आधार
वेळ उपहार
साधतो मी..!!

नसे त्यात खोट
बांधलेली मोट
समस्तांस बोट
दाविले मी..!!
घेती जे फ़ायदा
मोडून कायदा
फुकाचा वायदा
माझ्या लेखी..!!
एक माझी जाण
ना कोणी लहान
ना कोणी महान
शब्दजळी..!!
पामर अजाण
ना काढत उणं
माझच दळण
दळतो मी..!!
🙏🌹🙏
**सुनिल पवार..😄

माणूस / मन

माणूस / मन
==========
तुमका म्हणून सांगतय
माणसाच्या मनाचो
काय नेम नसता..
धरलो की चावता
अन सोडलो की पळता..!!

माझ्या मनाक
ता नेहमीच छळता
माय झयो
असो काय करता..
ओठात एक असता
अन पोटात
दुसरोच ठेवता..!!
मी म्हणलयं त्याका
अरे वाइच सुधार आता..
कित्या फसवतस लोका
मेल्या खाशील तू लाथा..!!
हसलो म्हणालो,
मेलेल्याक कोण मारतला
सचोटी खय उरलीय आता..
बरं आधी सांग माका
माणसात माणूस खय रव्हता..!!
😊*******************😊
******सुनिल पवार....

माणूस / मन
==========
तुमका म्हणून सांगतय
माणसाच्या मनाचो
काय नेम नसता..
धरलो की चावता
अन सोडलो की पळता..!!

माझ्या मनाक
ता नेहमीच छळता
माय झयो
असो काय करता..
ओठात एक असता
अन पोटात
दुसरोच ठेवता..!!
मी म्हणलयं त्याका
अरे वाइच सुधार आता..
कित्या फसवतस लोका
मेल्या खाशील तू लाथा..!!
हसलो म्हणालो,
मेलेल्याक कोण मारतला
सचोटी खय उरलीय आता..
बरं आधी सांग माका
माणसात माणूस खय रव्हता..!!
😊*******************😊
******सुनिल पवार....

Monday, 2 May 2016

|| शब्दांची लव्हाळी ||

|| शब्दांची लव्हाळी ||
=◆=◆=◆=◆=◆=
शब्दांची लव्हाळी
घेतोय मी
घासुन पुसून..
फिरवत बोट
धार पाहतोय मी
पुन्हा पुन्हा तपासून..!!

ऐकलय मी
यत्किंचितशः
त्या लव्हाळ्यानी
नष्ट केले
समस्त कुळास..
चहुओर तीच
माजलेली यादवी
वाटते
उखडून फेकावी
त्या विषवल्लीच्या
मुळास..!!

उगारावा का नाही
अन कोणावर..?
आपलेच आपण
विरोधक बनतोय..
प्रश्न तसाच
मनास भेडसावतोय
अन्
अनाहूत जन्मलेल्या
त्या मुसळीला
गर्भारलेल्या पुरुषार्थाआड़
मी व्यर्थच
लपवु पाहतोय..!!

अटळ आहे ऱ्हास
स्पष्ट दिसतयं..
तरीही प्रयत्न
शेवटचा करतोय..
येईल धावून
एखादा श्री कृष्ण
वाटते संपवेल
विवंचना समस्त
पण तोही
त्याचा अंगठा
लपवण्यात
आता व्यस्त दिसतोय..!!
🙏🌹🙏🌹🙏
***सुनिल पवार....

Sunday, 1 May 2016

|| महाराष्ट्र माझा ||

|| महाराष्ट्र माझा ||
**************
निधड्या छातीचा
रांगड्या मातीचा
विविध जातीचा
महाराष्ट्र माझा..!!


नाद मृदुंगाचा
टाळ चिपळयांचा
विठू वारकऱ्यांचा
महाराष्ट्र माझा..!!

शुर शिवबांचा
वीर मावळ्यांचा
ढवळ्या पवळ्यांचा
महाराष्ट्र माझा..!!

समाज सुधारकांचा
फुले आंबेडकरांचा
आवाज पुरोगामींचा
महाराष्ट्र माझा..!!

मराठी भाषेचा
गौरव देशाचा
सार्थ अभिमानाचा
महाराष्ट्र माझा..!!
****सुनिल पवार...
|| महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

|| गिरणीकामगार ||

गिरणी कामगार..
कधीकाळी या राज्यात, कामगार सच्चा राजा होता
मुंबईच्या गिरणगावाचा, तो ताठ मानेचा कणा होता
मोडेन पण वाकणार नाही, असाच करारी बाणा होता
बळीराजाच्या जोडीने, कामगार दिलदार राणा होता..!!
सामावून घेतले त्याने आपल्यात, गुजराती,पारसी तसेच हिंदी
ठसठशीत लाल कुंकवासोबत, शोभू लागली इवली बिंदी
पण इंग्रजाळल्या कावेबाज नितीने, पुन्हा एकदा घात केला
कब्जा मिळवून बाजाराचा, आर्थिक मालकी आघात केला..!!
कळलेच नाही कामागारास, मालक कधी गब्बर झाला
ताठ कण्याचा कामगार माझा, बघता बघता रबर झाला
लुप्त झाले उद्योग सारे, बंद पडला तो वैभवी भोंगा
अन् भुखंडाच्या श्रीखंडावर, करू लागले बोके दंगा.!!
मूलनिवासी कामगार इथला, खोपटासाठी अजून झगडतोय
आपला हक्क मिळवण्यासाठी, झिजवल्या चपला देहही झीजतोय
आता गतवैभवाचे गोडवे गात, शुभेच्छातून भेटतो कामगार
आपल्याचं माणसांनी केले त्यास, हतबल,लाचार आणि निराधार..!!
***सुनिल पवार...✍️
🌺महाराष्ट्र दिन तथा कामगार  दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌺