Sunday, 1 May 2016

|| गिरणीकामगार ||

गिरणी कामगार..
कधीकाळी या राज्यात, कामगार सच्चा राजा होता
मुंबईच्या गिरणगावाचा, तो ताठ मानेचा कणा होता
मोडेन पण वाकणार नाही, असाच करारी बाणा होता
बळीराजाच्या जोडीने, कामगार दिलदार राणा होता..!!
सामावून घेतले त्याने आपल्यात, गुजराती,पारसी तसेच हिंदी
ठसठशीत लाल कुंकवासोबत, शोभू लागली इवली बिंदी
पण इंग्रजाळल्या कावेबाज नितीने, पुन्हा एकदा घात केला
कब्जा मिळवून बाजाराचा, आर्थिक मालकी आघात केला..!!
कळलेच नाही कामागारास, मालक कधी गब्बर झाला
ताठ कण्याचा कामगार माझा, बघता बघता रबर झाला
लुप्त झाले उद्योग सारे, बंद पडला तो वैभवी भोंगा
अन् भुखंडाच्या श्रीखंडावर, करू लागले बोके दंगा.!!
मूलनिवासी कामगार इथला, खोपटासाठी अजून झगडतोय
आपला हक्क मिळवण्यासाठी, झिजवल्या चपला देहही झीजतोय
आता गतवैभवाचे गोडवे गात, शुभेच्छातून भेटतो कामगार
आपल्याचं माणसांनी केले त्यास, हतबल,लाचार आणि निराधार..!!
***सुनिल पवार...✍️
🌺महाराष्ट्र दिन तथा कामगार  दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌺

No comments:

Post a Comment