Monday, 2 May 2016

|| शब्दांची लव्हाळी ||

|| शब्दांची लव्हाळी ||
=◆=◆=◆=◆=◆=
शब्दांची लव्हाळी
घेतोय मी
घासुन पुसून..
फिरवत बोट
धार पाहतोय मी
पुन्हा पुन्हा तपासून..!!

ऐकलय मी
यत्किंचितशः
त्या लव्हाळ्यानी
नष्ट केले
समस्त कुळास..
चहुओर तीच
माजलेली यादवी
वाटते
उखडून फेकावी
त्या विषवल्लीच्या
मुळास..!!

उगारावा का नाही
अन कोणावर..?
आपलेच आपण
विरोधक बनतोय..
प्रश्न तसाच
मनास भेडसावतोय
अन्
अनाहूत जन्मलेल्या
त्या मुसळीला
गर्भारलेल्या पुरुषार्थाआड़
मी व्यर्थच
लपवु पाहतोय..!!

अटळ आहे ऱ्हास
स्पष्ट दिसतयं..
तरीही प्रयत्न
शेवटचा करतोय..
येईल धावून
एखादा श्री कृष्ण
वाटते संपवेल
विवंचना समस्त
पण तोही
त्याचा अंगठा
लपवण्यात
आता व्यस्त दिसतोय..!!
🙏🌹🙏🌹🙏
***सुनिल पवार....

No comments:

Post a Comment