Saturday, 17 August 2019

एक याद..

एक याद..
एक याद
लिखू तो कौनसी लिखू
तुम्हारी हर याद 
दिल के करीब है।
पर अफसोस
इस बात का है के
अब
सिर्फ यादों के सहारे जीना
मेरा नसीब है।
--सुनिल पवार..✍️

Saturday, 10 August 2019

अश्रुंचे मोल..

अश्रुंचे मोल..
वाहणाऱ्या अश्रुंचे मोल
तू आता तरी जाण..
तुझ्या बेपर्वा कोसळण्यात
थोडी विनम्रता आण..!!
थांबव आता मृत्यूसत्र
तुझा होऊ दे अनुराग..
जल जीवन असते म्हणतात
आपल्या ब्रीदला तू जाग..!!
--सुनिल पवार..✍️

रिश्ता...

रिश्ता...
रिश्ता जोड़ा है तो निभाना पड़ेगा
रूठे हुए को मनाना पड़ेगा।
मैं ही क्यों यह सवाल फ़िजूल है
मेल रखना रिश्तों का उसूल है।
तभी तो रिश्ता मजबूत बनेगा
जाते हुए कदमों को रोक पायेगा।
इक़ प्यार का कच्चा धागा काफी है
रिश्ता खुद ही उसमे बँध जाएगा।
--सुनिल पवार..✍️

रुक जाओ ना

रुक जाओ ना
कहने को तो दिल चाहता है।
पर पता नही
तुम्हारा दिल क्या कहता है।
जो देखा जो जाना
उसपर लगता नही के रुक जाओगे।
इतना तो पता है
के वक्त नही है यही बहाना करोगें।
--सुनिल पवार..✍️

बापाचं मन..

बापाचं मन..
स्वतः बाप झाल्याशिवाय
लेकास बापाचे मन कळत नाही..
बाप नावाच्या चंदनाचा सुवास
देह विझल्याशिवाय दरवळत नाही..!!
हीच खरी शोकांतिका आहे
बाप नावाच्या ताकदीच्या भूमिकेची..
जीवनरुपी नाटकाचा भार उचलूनही
तरतूद नसते कसल्याच मानधनाची..!!
--सुनिल पवार..✍️

पावसा आता तरी..

पावसा आता तरी..
फाटलेले आभाळ
थांबेना संततधार..
पाणीच पाणी चोहीकडे
वाहून गेलेले संसार..!!
जिथे तिथे पुराचे थैमान
नाही काडीचा आधार..
तुटवडा दाण्याचा
लोक भुकेने बेजार..!!
कोसळणाऱ्या दरडी
अन् खचणारे भू स्तर..
मुठीतल्या जीवाला
लागलेली घरघर..!!
चित्र हे विदारक
दिसे अति भयंकर..
पावसा, आता तरी आवर
तुझा अमानुष कहर..!!
--सुनिल पवार..✍️

हाक..

हाक..
ओढ तुझी मला
की कळेना माझी तुला,
इतके मात्र खरे की, 
हृदयाची हाक
जाणवते हृदयाला..
ही अनुभूती कुठून
अन् कशी मिळते प्रेमाला..
अशी कोणती संजीवनी
मिळते अचेत देहाला..!!
--सुनिल पवार..✍️
वाचा तिढा : भाग ५६
https://marathi.pratilipi.com/story/i94jayynxqzv…