Wednesday, 1 June 2022

तुजसाठीच वाटे

तुजसाठीच वाटे..


तुजसाठीच वाटे सजावे धजावे

तव शब्दांचे तनुवर मोरपीस फिरावे!

स्पर्श नजरेचा मन मोहरून जावे

अन् क्षणाने क्षणाचे विसावे घ्यावे!!

--सुनील पवार..

Friday, 27 May 2022

शहारामधले जीवन

शहारामधले जीवन..


शहारामधले जीवन

अशांत अशांत भासते!

इथे प्रत्येक जीवाला

जगण्याची भ्रांत दिसते!!

--सुनील पवार..

Friday, 15 April 2022

कभी कभी

कभी कभी..


कभी कभी हम सोचते है

वैसा होता नही!

इन्सान जैसा दिखता है

वैसा होता नही!!

 

हम देखते वही है  

जो सामने से दिखता है!

मगर हर उजाले के पीछे

अंधेरा होता है!!

 

इसमे कोई शक नही की

सच सामने आता है!

लेकीन उसके पहले ही 

बहुत कूछ खोना पडता है!!

--सुनील पवार..

Tuesday, 12 April 2022

ना तुला ना मला

।। ना तुला (°_°) ना मला ।।


ना तुला पुसणार
ना मला सोसनार..
प्राक्तनाच्या रेषा
गहिऱ्या असणार..!!

ना तुला उमजणार
ना मला कळणार..
हृदयाच्या वेदना..
हृदयास जाळणार..!!

ना तुला सलणार
ना मला छळणार..
मनात रुतलेली
दूर कशी पळणार..!!

ना तुला दिसणार
ना मी तिथे असणार..
स्वप्ने नेत्री तरीही
निरंतर वाहणार..!!
--सुनील पवार..

Saturday, 19 February 2022

सहजीवनाची कैक वर्ष

सहजीवनाची कैक वर्ष..

पाखरांसारखी उडून गेली
सहजीवनाची कैक वर्ष!
पंख लाभता पाखरांना
मनी दाटला अमाप हर्ष!!

दुःख सारे विरून जाण्या
पुरेसे आहे एक हास्य!
केवळ एक प्रेम स्पर्श
सुख हसत पत्करे दास्य!!
--सुनिल पवार..✍️

Wednesday, 29 September 2021

जीवन सुंदर आहे

 जीवन सुंदर आहे..


जीवन सुंदर आहे 

ते नित्य पाण्यासारखे वाहते!

कर्माची नाव त्यावरून

सुखदुःखाचा किनारा गाठते!!

--सुनील पवार..✍🏼

*सुप्रभात🌞शुभ सकाळ*

Wednesday, 25 August 2021

मर्म रक्षाबंधनाचे

 || रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

=====================

स्नेहाच्या कोंदनाला

रक्षणाचे कवच असते..


धागे कच्चे जरी

नाते हे अतूट असते..


रक्षा बंधनाचे खरे

हेच मर्म असते..


दूर गेलेलं बालपण

पुन्हा घेऊन येते..!!

--सुनिल पवार...✍🏼