Friday, 19 December 2014

।। बळी राजा ।।

।। बळी राजा ।।
**************
सरकार म्हणते अच्छे दिन आ गए
पण कोणाचे तेच मला नाही कळले
जगाचा पोशिंदा बळी राजास समस्याने घेरले
आत्महत्येच्या प्रश्नाने राज्यस छळले..!!

संपणार कधी हे आत्महत्येच सत्र
अधिवेशनाचे संपतात सत्रावर सत्र
प्रश्न रोजच ऐरणीवर असतो
उपाय योजना उरतात कागदावर मात्र..!!

सावकारी पाश संपवायाची भाषा होते
वास्तवात मात्र ती वल्गनाच ठरते
मदतीचे पॅकेज मधल्या मधे विरते
सावकारा शिवाय सांगा दूसरे कोण उरते..!!

मिडियाची असते इथे TRP ची लढाई
विरोधक करतात बहिष्काराची घाई
मध्यम वर्गाला कामातुन सवड नाही
बळीराजाच्या अश्रुला का खरच मोल नाही..??

निसर्गाने झोडले सावकारने नाडले
कर्जाच्या उंदाराने पुरते पोखरले
सरकारने मदतीचे तोंडास पान फुसले
मग
आत्महत्येशिवाय सांगा हाती काय उरले..!!
*******
आत्महत्येशिवाय हाती काय उरले..!!
******************************
सुनिल पवार
【चकोर】


1 comment: