Wednesday, 31 December 2014

II नविन वर्षाच्या वाटेवर II



II नविन वर्षाच्या वाटेवर II
"=●=●=●=●=●=●=●=
नविन वर्षाच्या वाटेवर,
मज नव्याने आता चालायचे आहे..!!
एका नव्या विश्वासाने,
मज अश्वासक पाऊल टाकायचे आहे ..!!

जाती धर्माचे बंध झुगारून,
मज माणुसकीस गाठायचे आहे..
सर्व समतेचे बिज नवे
मज प्रत्येक माणसात वाटायचे आहे..!!
पदोपदी जरी मार्ग काटेरी,
मज फुल त्यातून वेचायचे आहे..
बंद कुपीतील अत्तर सुगंधी,
मज मन मनात सिंचायाचे आहे..!!
उभ्या भिंती जरी दुहीच्या,
मज घर अभेद्य बांधायचे आहे..
दुखावल्या त्या प्रत्येक मना,
मज हळुवारपणे सांधायचे आहे..!!
😊★★★★★★★★😊
******सुनिल पवार..........

Tuesday, 30 December 2014

।। आमच ही नविन वर्ष ।।


।। आमच ही नविन वर्ष ।।
********************
आणखी एक वर्ष सरले
होते जे गरीबीने पिचले
हायसे वाटले मनास आमच्या
पंख त्याचे जे वर्षाने छाटले..!!

आयुष्याचा वनवास आमच्या
आणखी एक वर्षाने कमी झाला
लागलो आम्ही ही आनंदे
मग नववर्षाच्या स्वागताला..!!

तुमच्या सारखी नसते हो
आमची तंग कपड्यातली पार्टी
निळ्या आभाळाची असते रोषणाई
अन उघड़ी बोडकी आमची कार्टी..!!

दारुच्या थेंबासाठी तुमच्याकडे
पाण्यासारखा पैसा वाहतो..
अन पाण्याच्या एका थेंबासाठी
आमचा जीव रोजच तळमळतो..!!

नव वर्षाची नव पहाट तुमची
नशेच्या अंमलाखाली गुजरते
वाट पहातोय अजुनही आम्ही
पहाट आमची कधी सुधरते...!!

जातील सारे तिमिर पळून
फळेल कधी हो आमची इच्छा..
स्वागत करतो आम्ही नववर्षाचे
देतो तुम्हास हार्दिक शुभेच्छा..!!
************************
सुनिल पवार
[चकोर]

Thursday, 25 December 2014

।। सांता क्लॉज आला ।।

।।सांता क्लॉज आला।।
********************
बर्फाच्या मार्गातून,
हरणाच्या गाडीतून
दूर देशातून
बुड्ढा man आला
अबाल वृद्धांचा
सांता क्लॉज आला..!!
शुभ्र धवल दाढ़ीतला
लाल पेहरावातला
गोंडेदार टोपीवाला
बुड्ढा man आला
अबाल वृद्धांचा
सांता क्लॉज आला..!!
पाठीवर पोटले घेवून
चेहऱ्यावर हास्य ठेवून
हर्षाचा मेवा घेऊन
बुड्ढा man आला
अबाल वृद्धांचा
सांता क्लॉज आला..!!
मुलांच्या स्वप्नातला
मोठ्यांच्या मनातला
जन माणसातला
बुड्ढा man आला
अबाल वृद्धांचा
सांता क्लॉज आला..!!
*******************
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
सुनिल पवार
【चकोर】

Tuesday, 23 December 2014

II आठवणीतला सांता II

II MERRY  'X'MAS II
II आठवणीतला सांता II
*************************
वाटते,
नाताळ दिनी सांता बनावे..
सुखाची पोटली घेऊन फिरावे..!!

दिन दुबळ्यांचे अश्रु फुसावे..
हास्याचे मोती मुक्त उधळावे..!!

जाती धर्माचे बंध तुटावे..
किल्मिष मनाचे गळून जावे..!!

सान थोरांचे आशीर्वाद घ्यावे..
हृदयात सर्वांच्या घर करावे..!!

सरते वर्ष हे यादगार व्हावे..
आठवणीतला सांता बनुन रहावे..!!
**************
सुनिल पवार
[चकोर]

।। इधर भी, उधर भी ।।

।। इधर भी, उधर भी ।।
*******************
गमो के बादल है
इधर भी, उधर भी..
कभी तो होगी बरसात
इधर भी, उधर भी..!!

आंसुओ के सैलाब है
इधर भी, उधर भी..
धूल जाएंगे गम कभी
इधर भी, उधर भी..!!

मायूसी के साये है
इधर भी, उधर भी..
दियेकी लव होगी कभी
इधर भी, उधर भी..!!

मुस्कुराने की चाह है
इधर भी, उधर भी
मिल जायेगी राह कभी
इधर भी, उधर भी..!!
******************
सुनिल पवार
【चकोर】


Friday, 19 December 2014

।। बळी राजा ।।

।। बळी राजा ।।
**************
सरकार म्हणते अच्छे दिन आ गए
पण कोणाचे तेच मला नाही कळले
जगाचा पोशिंदा बळी राजास समस्याने घेरले
आत्महत्येच्या प्रश्नाने राज्यस छळले..!!

संपणार कधी हे आत्महत्येच सत्र
अधिवेशनाचे संपतात सत्रावर सत्र
प्रश्न रोजच ऐरणीवर असतो
उपाय योजना उरतात कागदावर मात्र..!!

सावकारी पाश संपवायाची भाषा होते
वास्तवात मात्र ती वल्गनाच ठरते
मदतीचे पॅकेज मधल्या मधे विरते
सावकारा शिवाय सांगा दूसरे कोण उरते..!!

मिडियाची असते इथे TRP ची लढाई
विरोधक करतात बहिष्काराची घाई
मध्यम वर्गाला कामातुन सवड नाही
बळीराजाच्या अश्रुला का खरच मोल नाही..??

निसर्गाने झोडले सावकारने नाडले
कर्जाच्या उंदाराने पुरते पोखरले
सरकारने मदतीचे तोंडास पान फुसले
मग
आत्महत्येशिवाय सांगा हाती काय उरले..!!
*******
आत्महत्येशिवाय हाती काय उरले..!!
******************************
सुनिल पवार
【चकोर】


।। श्रद्धांजली ।।

।। श्रद्धांजली ।।
**************
कसला रे तुझा धर्म
जो करवितो कुकर्म
कसला तुझा जिहाद
जो करे तुज बरबाद..!!

ओळखेंना माणसाला
काळिमा मानवतेला
फुत्कारशी गरळ नित्य
साप तू जहरीला..!!

तुझ्या क्रुरते पुढे
सैतानही असेल लाजला
नीच तुझी करणी
बालकांचा बळी घेतला..!!

(ना)पाक पुत्र धर्मांध
भस्मासुर जसा उलटला
षंड तुझ्या कृत्याने
मृत्युही इथे ओशाळला..!!
***
मृत्युही इथे ओशाळला..!!
**********************
सुनिल पवार
【चकोर】


।। सामान्य माणूस ।।

।। सामान्य माणूस ।।
*****************
सामान्य माणूस A कॉमन मॅन
भोळा असला तरी मुर्ख नाही
असामान्य सहन शक्तीस अंत नाही
अंत पाहत असेल जर कोणी कधी..??
तर अंत केल्याशिवाय शांत होणार नाही..!!

सामान्य माणूस A कॉमन मॅन
डोळे मिटून परी झोपलेला नाही
उठतो पेटुन सहसा खवळत नाही
खवळला जर चुकून कधी..??
तर समाज ढवळल्या शिवाय राहणार नाही..!!

सामान्य माणूस A कॉमन मॅन
अर्ध पोटी तरी हव्यासी नाही
गरीब असला परी निर्बल नाही
ललकारेल जर कोणी कधी..??
तर नेस्तनाबूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही..!!
सामान्य माणूस A कॉमन मॅन
दी ग्रेट मॅन..!!
**************
सुनिल पवार
【चकोर】


।। सोनेरी क्षण ।।

।। सोनेरी क्षण ।।
तुलाही आठवत असतील का ग
आपल्या प्रेमाचे ते सोनेरी क्षण..
मला शोधणारी तुझी जादुई नजर
अन तुझ्या भोवती घुटमळणारे माझे मन..!!

तासंतास तुझी वाट पाहत बसायचे
तू मात्र हटकुन उशिराच यायचे..
तू आली नाहीस की मग स्वतःवर रुसायचे
अन तुझ्या अल्लड बहाण्यात मी अलगद फसायचे..!!

चुकून कधी चक्र उलटे फिरले ज़रा जरी
तुझ्या रुसण्यास अन मौनास सीमा नसायची..
मग तुझी मनधरणी करण्यात सखे
दिवस काय सारी रात्रही तोकडीच असायची..!!

तुझा राग लटका असायचा हे मला जाणवायचे
तुझे ते बोलके डोळे हळूच मला खुणवायचे..
आवडायचे मला तुझे लटकेच रुसणे
अन मला फसलेला पाहुन तुझे खळखळुन हसणे..!!

कळलेच नाही ग ऋतुंनी कधी बदलली कुस
अन तुझ्या गुलाबी मनाला कोणी लावली फुस..
निघुन गेलीस तू सारेच घेवून सोनेरी क्षण
मागे उरलय मात्र आता एक खिन्न कोमेजलेल मन..!!
एक खिन्न कोमेजलेल मन..!!
सुनिल पवार
【चकोर】


II धर्म II


II धर्म II
********
ना तू रे कोणाचा इथे..
नाही कोणी तुझा..
नाही शाश्वत देह वेड्या..
चल सोड भाव दूजा..!!
*****
चार दिसाचे सगेसोयरे..
चार दिवसांची नातीगोती..
मग कशास हवी नसती चिंता..
का बाळगावी ती भीती..!!
*****
सोड व्यर्थ हाव माणसा..
कर निष्काम कर्म रे..
सर्व श्रेष्ठ जन्म तुझा..
जप मानवता धर्म रे..!!
जप मानवता धर्म रे..!!
*****
सुनिल पवार
[चकोर]

Tuesday, 9 December 2014

II हवे कशाला II



II हवे कशाला II
वास्तवाशी माझा घरोबा..
स्वप्नांचे इमले हवे कशाला..!!

ह्या मातीशी माझा याराना
आकाश कवेत हवे कशाला..!!

ओंजळीत भरून प्रकाश माझ्या
तिमिराचे भय ते हवे कशाला..!!

नाद ना मजला जुगाराचा
नसीबाचे फासे हवे कशाला..!!

खेळतो मी खेळ सत्याचा
पत्त्याचे डाव ते हवे कशाला..!!

बोलतो मी बोल ते खड़े
शब्दांचे बुडबुडे हवे कशाला..!!

जगने माझे हातात माझ्या
मरणाचे भय ते हवे कशाला..!!
सुनिल पवार
[चकोर]

।। लग्न ।।


।। लग्न ।।
********
३६ गुण जुळले जरी
३६ चा आकड़ा सुटत नाही
सप्तपदीच्या सात फेऱ्यात
भटास दक्षिणा उरत नाही..!!

पोटभर उठल्या पंगती
रित मन भरत नाही
देण्या घेण्यास आता
पैसा काही पुरत नाही..!!

उसने काढले वाण
फेडणे आता होत नाही
झाला रिकामी खीसा
भरता मात्र येत नाही..

होऊन गेले लग्न एकदाचे
निभावणे काही होत नाही
वड्याच तेल वांगयावर
आल्याशिवाय राहत नाही..!!

म्हणून सांगतो..

लग्न मनाचा मेळ असे
भातुकालीचा खेळ नाही
काटकसरीचा मंत्र जपा
अजुन गेली वेळ नाही..!!
********************
सुनिल पवार
[चकोर]

II श्री दत्त गुरु स्तवन II

।। श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ।।
******************************
दिगंबरा दिगंबरा
श्री दत्त गुरु दिगंबरा..
विश्वंभर औदुंबरा
दयाघना हे करुणाकरा..!!
सकल पालनहरा
भक्त वत्सल शुभंकरा..
अनुसूयेच्या पुत्रा
ब्रह्मा, विष्णु, महेश्वरा..!!
नाथांच्या नाथा
गुरुंच्या तू गुरुवरा..
दया मज दीक्षा
अज्ञान माझे दूर करा..!!
अनन्य मी अपराधी
शरण आलो कृपा करा..
नामितो तुज देवा
मायेचे तव छत्र धरा..!!
दिगंबरा दिगंबरा
श्री दत्त गुरु दिगंबरा..!!
***********************
सुनिल पवार
[चकोर]


:::II प्रारब्ध II:::



:::II प्रारब्ध II:::
***************
उपकार केले, अपकार मिळाले..
भलाईच्या नशिबी, मरण आले..!!

ज्यांस सावरले, तेच फिरले..
खेकडेच सारे, दुनयेत भरले..!!

हात मिळवले, कलमच केले..
देण्यास आता, काय उरले..??

सर्वस्व लुटले, रिते न झाले..
प्रारब्ध माझे, ललाटी पुरले..!!
********************************
********************************
सुनिल पवार
[चकोर]

।। कोशिश ।।



।। कोशिश ।।
***************
कोशिश करनेवाले की
कभी हार नहीं होती
हौसले बुलंद देखकर
हार भी है डगमगाती..!!

बढ़ते हुए कदमो को
मुडके ना तू पीछे हटा
मेहनत को दे और हवा
दूर होगी अंधियारी घटा..!!

साथ ना मिले गर किसीका
तो बना हमसफ़र अपना साया
मंझिल बनेगी तेरी राह
रोशन कर हौसलो का दिया..!!

चूमेगी सफलता कदम तेरे
मुट्ठी में होगा सारा आसमाँ
बस इतना याद रख दोस्त
ना करना तू कभी गुमाँ..!!

सुनिल पवार
[चकोर]

Wednesday, 3 December 2014

:::II कागज II:::


:::II कागज II:::
****************
कागज़ के दिल में..
ना जाने कितनी गहराई..
दिल की हर बात..
है कागज़ में समाई..!!

किसी की अच्छाई..
तो किसी की बुराई..
हर एक बात..
है कागज़ ने अपनाई..!!

मरोड़े उसे कोई..
कोई गिराए शाई..
छू सकी ना उसे..
कभी कोई रुसवाई..!!

पढ़ाई और लिखाई..
है कागज़ से आई..
करे सबको सयाना..
है दिल में सच्चाई..!!

पेडो का ये पुत्र..
अब दे रहा दुहाई..
ना काटो अब हमें..
कागज़ बचाओ भाई..!!
(पुन्हा प्रसारित)

*चकोर*
(सुनिल पवार)