अटी शर्ती..
हल्ली प्रत्येक गोष्टीत
अटी शर्तीच्या किड्याचा
शिरकाव झालेला दिसतो..
नात्या नात्याचे
तो शिरकाण करताना दिसतो..!!
प्रेम तर सोडाच
पण मैत्री सुद्धा यातून सुटली नाही..
निखळता ज्यास म्हणतात
ती अजून तरी मला भेटली नाही..!!
जो जो भेटतो
तो तो अट घालत सुटतो..
जन्मदाते, जन्माचा साथी
इष्टमित्र, सगेसोयरे, आपले परके
प्रत्येकाचा अनुभव असाच येतो..!!
जेव्हा आपलेच जीवन
दुसऱ्याच्या अटी शर्तीवर
आपणास चालवावे लागते..
तेव्हा आपल्या आत्मसन्मानास
दावणीला लावले जाते
असे आता खेदाने म्हणावे लागते..!!
--वसुंधरा..