II दृष्टिकोन II
=========
कितीही निरभ्र असू दे आकाश
न भावणार ते कधीच मनास..
लुकलुकणारे तारे नसतील जर त्यात
तर काय अर्थ उरतो जीवनास..??
आभाळाचंही
व्हायला हवं आकाश कधीतरी..
तरच रंगत वाढेल
सूर्य, चंद्राच्या
लपंडावाची..
घ्यायला हवी
थोडी उसंत मनाने..
तीच असेल सुरवात नव्या रुजवातीची..!!
देणं
आभाळाचं असो वा आकाशाचं
घेणं मात्र आपलंच असायला हवं..
मग भरलेलं असो वा असो रितं
लेणं मनाचं शोभून दिसायला हवं..!!
आभाळ काय अन आकाश काय
एकाच मनाचे ते दोन कंगोरे
भरलेलं कधी रितं होणार
अन
रितं हे कधीतरी भरणार
इतकं मात्र निश्चित
दृष्टिकोन मनाचा दिशा तयास देणार..!!
***सुनिल पवार...✍

No comments:
Post a Comment