Wednesday, 31 December 2014

II नविन वर्षाच्या वाटेवर II



II नविन वर्षाच्या वाटेवर II
"=●=●=●=●=●=●=●=
नविन वर्षाच्या वाटेवर,
मज नव्याने आता चालायचे आहे..!!
एका नव्या विश्वासाने,
मज अश्वासक पाऊल टाकायचे आहे ..!!

जाती धर्माचे बंध झुगारून,
मज माणुसकीस गाठायचे आहे..
सर्व समतेचे बिज नवे
मज प्रत्येक माणसात वाटायचे आहे..!!
पदोपदी जरी मार्ग काटेरी,
मज फुल त्यातून वेचायचे आहे..
बंद कुपीतील अत्तर सुगंधी,
मज मन मनात सिंचायाचे आहे..!!
उभ्या भिंती जरी दुहीच्या,
मज घर अभेद्य बांधायचे आहे..
दुखावल्या त्या प्रत्येक मना,
मज हळुवारपणे सांधायचे आहे..!!
😊★★★★★★★★😊
******सुनिल पवार..........

Tuesday, 30 December 2014

।। आमच ही नविन वर्ष ।।


।। आमच ही नविन वर्ष ।।
********************
आणखी एक वर्ष सरले
होते जे गरीबीने पिचले
हायसे वाटले मनास आमच्या
पंख त्याचे जे वर्षाने छाटले..!!

आयुष्याचा वनवास आमच्या
आणखी एक वर्षाने कमी झाला
लागलो आम्ही ही आनंदे
मग नववर्षाच्या स्वागताला..!!

तुमच्या सारखी नसते हो
आमची तंग कपड्यातली पार्टी
निळ्या आभाळाची असते रोषणाई
अन उघड़ी बोडकी आमची कार्टी..!!

दारुच्या थेंबासाठी तुमच्याकडे
पाण्यासारखा पैसा वाहतो..
अन पाण्याच्या एका थेंबासाठी
आमचा जीव रोजच तळमळतो..!!

नव वर्षाची नव पहाट तुमची
नशेच्या अंमलाखाली गुजरते
वाट पहातोय अजुनही आम्ही
पहाट आमची कधी सुधरते...!!

जातील सारे तिमिर पळून
फळेल कधी हो आमची इच्छा..
स्वागत करतो आम्ही नववर्षाचे
देतो तुम्हास हार्दिक शुभेच्छा..!!
************************
सुनिल पवार
[चकोर]

Thursday, 25 December 2014

।। सांता क्लॉज आला ।।

।।सांता क्लॉज आला।।
********************
बर्फाच्या मार्गातून,
हरणाच्या गाडीतून
दूर देशातून
बुड्ढा man आला
अबाल वृद्धांचा
सांता क्लॉज आला..!!
शुभ्र धवल दाढ़ीतला
लाल पेहरावातला
गोंडेदार टोपीवाला
बुड्ढा man आला
अबाल वृद्धांचा
सांता क्लॉज आला..!!
पाठीवर पोटले घेवून
चेहऱ्यावर हास्य ठेवून
हर्षाचा मेवा घेऊन
बुड्ढा man आला
अबाल वृद्धांचा
सांता क्लॉज आला..!!
मुलांच्या स्वप्नातला
मोठ्यांच्या मनातला
जन माणसातला
बुड्ढा man आला
अबाल वृद्धांचा
सांता क्लॉज आला..!!
*******************
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
सुनिल पवार
【चकोर】

Tuesday, 23 December 2014

II आठवणीतला सांता II

II MERRY  'X'MAS II
II आठवणीतला सांता II
*************************
वाटते,
नाताळ दिनी सांता बनावे..
सुखाची पोटली घेऊन फिरावे..!!

दिन दुबळ्यांचे अश्रु फुसावे..
हास्याचे मोती मुक्त उधळावे..!!

जाती धर्माचे बंध तुटावे..
किल्मिष मनाचे गळून जावे..!!

सान थोरांचे आशीर्वाद घ्यावे..
हृदयात सर्वांच्या घर करावे..!!

सरते वर्ष हे यादगार व्हावे..
आठवणीतला सांता बनुन रहावे..!!
**************
सुनिल पवार
[चकोर]

।। इधर भी, उधर भी ।।

।। इधर भी, उधर भी ।।
*******************
गमो के बादल है
इधर भी, उधर भी..
कभी तो होगी बरसात
इधर भी, उधर भी..!!

आंसुओ के सैलाब है
इधर भी, उधर भी..
धूल जाएंगे गम कभी
इधर भी, उधर भी..!!

मायूसी के साये है
इधर भी, उधर भी..
दियेकी लव होगी कभी
इधर भी, उधर भी..!!

मुस्कुराने की चाह है
इधर भी, उधर भी
मिल जायेगी राह कभी
इधर भी, उधर भी..!!
******************
सुनिल पवार
【चकोर】


Friday, 19 December 2014

।। बळी राजा ।।

।। बळी राजा ।।
**************
सरकार म्हणते अच्छे दिन आ गए
पण कोणाचे तेच मला नाही कळले
जगाचा पोशिंदा बळी राजास समस्याने घेरले
आत्महत्येच्या प्रश्नाने राज्यस छळले..!!

संपणार कधी हे आत्महत्येच सत्र
अधिवेशनाचे संपतात सत्रावर सत्र
प्रश्न रोजच ऐरणीवर असतो
उपाय योजना उरतात कागदावर मात्र..!!

सावकारी पाश संपवायाची भाषा होते
वास्तवात मात्र ती वल्गनाच ठरते
मदतीचे पॅकेज मधल्या मधे विरते
सावकारा शिवाय सांगा दूसरे कोण उरते..!!

मिडियाची असते इथे TRP ची लढाई
विरोधक करतात बहिष्काराची घाई
मध्यम वर्गाला कामातुन सवड नाही
बळीराजाच्या अश्रुला का खरच मोल नाही..??

निसर्गाने झोडले सावकारने नाडले
कर्जाच्या उंदाराने पुरते पोखरले
सरकारने मदतीचे तोंडास पान फुसले
मग
आत्महत्येशिवाय सांगा हाती काय उरले..!!
*******
आत्महत्येशिवाय हाती काय उरले..!!
******************************
सुनिल पवार
【चकोर】


।। श्रद्धांजली ।।

।। श्रद्धांजली ।।
**************
कसला रे तुझा धर्म
जो करवितो कुकर्म
कसला तुझा जिहाद
जो करे तुज बरबाद..!!

ओळखेंना माणसाला
काळिमा मानवतेला
फुत्कारशी गरळ नित्य
साप तू जहरीला..!!

तुझ्या क्रुरते पुढे
सैतानही असेल लाजला
नीच तुझी करणी
बालकांचा बळी घेतला..!!

(ना)पाक पुत्र धर्मांध
भस्मासुर जसा उलटला
षंड तुझ्या कृत्याने
मृत्युही इथे ओशाळला..!!
***
मृत्युही इथे ओशाळला..!!
**********************
सुनिल पवार
【चकोर】