सर सुखाची श्रावणी..
सर सुखाची श्रावणी
माझ्या अंगणात येते।
सप्तरंगांचे स्वप्न ते
नेत्री रुजवत जाते।
मन हिरवे पाचूचे
सय कोंदण गं होते..
शुभ्र दवाचे गोंदण
पानाफुलांस लाभते।
खळखळ ती ओढीची
शांत लयीत धावते।
मलयातुनी आशेच्या
अवचित डोकावते।
सरीवर सर येते
मन सैरभैर होते।
माहेराच्या भेटीलागी
ओढ जीवास लागते।
--सुनिल पवार..✍️
पानाफुलांस लाभते..!!
खळखळ गं ओढीची
शांत लयीत धावते..
मलयातुनी आशेच्या
अवचित डोकावते..!!
सरीवर सर येते
मन सैरभैर होते..
माहेरच्या भेटीलागी
ओढ जीवास लागते..!!
--सुनिल पवार..

1414