Saturday, 26 November 2022

अटी शर्ती

 अटी शर्ती..

 

हल्ली प्रत्येक गोष्टीत

अटी शर्तीच्या किड्याचा

शिरकाव झालेला दिसतो..

नात्या नात्याचे

तो शिरकाण करताना दिसतो..!!

 

प्रेम तर सोडाच

पण मैत्री सुद्धा यातून सुटली नाही..

निखळता ज्यास म्हणतात

ती अजून तरी मला भेटली नाही..!!

 

जो जो भेटतो

तो तो अट घालत सुटतो..

जन्मदाते, जन्माचा साथी

इष्टमित्र, सगेसोयरे, आपले परके

प्रत्येकाचा अनुभव असाच येतो..!!

 

जेव्हा आपलेच जीवन

दुसऱ्याच्या अटी शर्तीवर

आपणास चालवावे लागते..

तेव्हा आपल्या आत्मसन्मानास

दावणीला लावले जाते

असे आता खेदाने म्हणावे लागते..!!

--वसुंधरा..

Tuesday, 22 November 2022

कवी आईना

 कवी आईना..


कळे ना मजला काही
काय असतो कवी..
आता त्याच्याही मनाची
चाचणी घ्यायला हवी..!!

त्याच त्याच शब्दात
का फसत असतो कवी..
कधीतरी वाचून पहावी
त्याने एखादी नवी..!!

जगास नित्य दाखवतो
नवा आईना कवी..
आपलीही छबी त्यात
जरा पारखून पहावी..!!

आता तुम्ही म्हणाल
मला सुद्धा कवी..
त्यातलीच एक प्रत
खुशाल मला द्यावी..!!
--सुनिल पवार..